Devendra Fadnavis in Nagpur: पुणे आणि पुणेकरांबाबत नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा होताना पाहायला मिळते. कधी इथल्या ऐतिहासिक वारशाबद्दल तर कधी इथल्या पुणेकर मंडळींबद्दल. अर्थात, प्रत्येक ठिकाणच्या व्यक्ती गुणविशेषांबाबत जशी उदाहरणं दिली जातात, तशीच पुणेकरांबाबतही दिली जातात. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच पुणे आणि पुणेकरांबाबत केलेलं असंच एक विधान सध्या चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे नागपूरमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीसांनी हे विधान केल्यामुळे ते सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

नागपूरमध्ये पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते. नागपूर मेट्रोची कामगिरी व वाटचाल यासंदर्भातला आढावा मांडणाऱ्या या पुस्तक प्रकाशनासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील मेट्रो वाटचालीचाही आढावा घेतला.

bjp strategy to capture konkan through allocation of ministerial posts
मंत्रीपदांच्या वाटणीतून कोकणावर कब्जा मिळवण्याचे भाजपाचे डावपेच
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
What sharad pawar wrote on that paper chhagan bhujbal says
Chhagan Bhujbal: शरद पवारांनी त्या कागदावर काय लिहून दिलं होतं? छगन भुजबळांनी सांगितला पवारांचा ‘तो’ संदेश; म्हणाले…
Sanjay Raut News
Sanjay Raut : “मतदारांना XXX आणि लोकशाहीला…”, संजय राऊत यांची संजय गायकवाडांवर जोरदार टीका, एकनाथ शिंदेंना केलं ‘हे’ आवाहन
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
Devendra Fadnavis and sharad pawar
“घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तीचा नामोल्लेख…”, संतोष देशमुख हत्याप्रकरणी शरद पवारांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!

“महाराष्ट्रात आम्ही पहिली मेट्रो मुंबईत सुरू केली. ११ किलोमीटरच्या मार्गासाठी ११ वर्षं लागली. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या काळात वेगानं आम्ही काम केलं. मुंबईत आम्ही पाच वर्षांत ३३५ किलोमीटर मेट्रोच्या जाळ्याची सुरुवात केली. नागपुरात ४ वर्षांत ३२ किलोमीटरच्या मार्गिका सुरू केल्या. पुण्यातही आम्ही तेच केलं. पुणेही सर्वाधिक वेगानं तयार झालेल्या मेट्रोपैकी एक ठरली आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुणे मेट्रो आणि बुद्धिमान पुणेकर!

दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात मेट्रो सुरू करतानाचा एक किस्सा उपस्थितांना सांगितला. “मी नागपूरच्या लोकांना सांगू इच्छितो की आम्ही आधी इथल्या मेट्रोसाठी कंपनी तयार केली होती ‘नागपूर मेट्रो’. पुण्यात बऱ्याच दिवसांपासून चर्चा चालू होती की तिथे मेट्रो तयार होईल वगैरे. पुणे हे बुद्धिमान लोकांचं शहर आहे. बुद्धिमान लोकांना एकत्र आणणं फार कठीण काम आहे. त्यामुळे मेट्रो भूमिगत बनेल, वरून बनेल, खालून बनेल याची चर्चा होती. एका बैठकी गडकरी आणि मी असे आम्ही दोघं होतो. त्या बैठकीत आम्ही निर्णय घेतला की ही मेट्रो भूमिगत होणार नाही. नागपूरला जशी झालीये तशीच होईल. फक्त काही ठिकाणी गरज आहे त्यानुसार भूमिगत होईल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय, पारंपरिक स्वागत, पोलीस मानवंदना बंद

पुणेकर नाराज, फडणवीसांनी केली ‘ही’ क्लृप्ती!

दरम्यान, मेट्रो कंपनीच्या नावामुळे वाद निर्माण झाल्यानंतर केलेल्या युक्तीबद्दल देवेंद्र फडणवीसांनी यावेळी माहिती दिली. “मी दीक्षितजींचं काम पाहिलं होतं. त्यामुळे मी नागपूर मेट्रोला पुणे मेट्रोचं काम दिलं. पण पुण्याचे लोक नाराज झाले की नागपूरचं मॉडेल पुण्यात टाकण्याचा प्रयत्न होतोय वगैरे. मग मोठी गडबड झाली. म्हणे नागपूरवाल्यांना काम द्यायचं आहे म्हणून हे सर्व चालू आहे. मी दीक्षितजींना सांगितलं की नाव बदलून टाका. आम्ही एका दिवसात नागपूर मेट्रोचं नाव ‘महामेट्रो’ करून टाकलं. महामेट्रो कॉर्पोरेशन ही मूळची नागपूर मेट्रो कॉर्पोरेशन आहे. आज देशभरातल्या विविध राज्यांकडून महामेट्रोला बोलावणं येत आहे की त्या राज्यांमध्ये मेट्रो उभारली जावी. महामेट्रोनं हे कौशल्य आणि वेग विकसित केला आहे”, असं देवेंद्र फडणवीसांनी नमूद केलं.

Story img Loader