Devendra Fadnavis On Santosh Deshmukh Case : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे. या संपू्र्ण प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडून करण्यात येत आहे. मात्र, तपास यंत्रणांतील अधिकाऱ्यांवरून अनेकदा आरोप-प्रत्यारोप झाले, त्यामुळे तपासातील काही अधिकारी बदलण्यात आले. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी विरोधक करत असून यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली. तसेच या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार की नाही? याबाबतही त्यांनी भाष्य केलं. तसेच ‘तपासामध्ये अनेक गोष्टी गोपनीय ठेवूनच तपास केला जातो. त्यामुळे आपण तपास यंत्रणांवर दबाव न आणता तपास करू दिलं पाहिजे’, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा