CM Devendra Fadnavis on Santosh Deshmukh murder case: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना लवकर शिक्षा होऊन कुटुंबियांना न्याय मिळावा, या मागणीसाठी ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. या मोर्चामधून होत असलेल्या भाषणांवरून आता वाद निर्माण होत आहेत. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी चिथावणीखोर विधान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर भाजपा आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची नाराजी ओढवून घेतली आहे. त्यातच आता या मोर्चांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर येथे आज भाजपाची सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सदर मोर्चाबाबत भाष्य केले आहे. यावेळी मोर्चाबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “मोर्चे काढण्याचा सर्वांना अधिकार आहे. बीड प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने कारवाई करत आहे. निर्धाराने कारवाई होत आहे. या प्रकरणात काहीही झाले, कुणीही वाचविण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही आरोपींना वाचवू देणार नाही. जे जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करून हप्ते गोळा करतात त्या सर्वांवर जरब बसविण्याचे आम्ही ठरविले आहे.

हे वाचा >> ‘चौकशी करणारेच वाल्मिक कराडचे मित्र’, PSI बरोबरचे फोटो पोस्ट करत जितेंद्र आव्हाडांचे तपासावरच प्रश्नचिन्ह

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना धमकाविण्यात येत असल्याबाबतचाही प्रश्न यावेळी फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, अंजली दमानियांची जी काही तक्रार असेल ती त्यांनी पोलिसांकडे द्यावी. त्यावर पोलीस नक्कीच कारवाई करतील.

आरोपी गुजरातमध्ये गेले असले तरी…

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी १५ दिवस गुजरातमध्ये राहिल्याची माहिती आता समोर येत आहे. गुजरातमधील एका मंदिरात त्यांनी आश्रय घेतल्याचे तपासात पुढे आले. त्यावर फडणवीस म्हणाले की, आरोपी कुठेही गेले असते आणि त्यांना कुणीही मदत केलेली असेल तरी आम्ही कारवाई करत आहोत. मदत करणाऱ्यांनाही आम्ही सोडत नाहीत. या प्रकरणात नीट चौकशी होऊ द्यावी. या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी होऊ नये, ही गंभीर बाब आहे. एका लोकप्रिय सरपंचाची निर्घृण हत्या झाली आहे. त्यामुळे त्या हत्येचा उपयोग राजकारणासाठी न करता त्यातून समाज सुधारेल असा प्रयत्न केला पाहीजे.

हे ही वाचा >> “बेभान सुटलेला बैल…”, फडणवीसांचा उल्लेख करत अमोल मिटकरींची सुरेश धसांवर टीका

महाराष्ट्रातील एक लाख बुथवर सदस्य नोंदणी सुरू केली आहे. भाजपाने दीड कोटी सदस्य नोंदणीचे ध्येय समोर ठेवले आहे. हे ध्येय आम्ही लवकरच पूर्ण करू, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.