Amruta Fadnavis Ukhana : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काल (१२ जानेवारी रोजी) पुण्याचे भाजपाचे माजी नगसेवक किरण दगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या महिला मेळाव्याला उपस्थिती लावली होती. उपस्थित महिलांसमोर त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत झक्कास उखाणा घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमृता फडणवीस या विविध सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असतात. विविध उपक्रमांनाही त्या हजेरी लावतात. महिला सक्षमीकरण वा पर्यावरणपूरक कार्यक्रमांत त्या सातत्याने दिसतात. आता ठिकठिकाणी महिला मेळावे आयोजित केले जातात. लाडकी बहीण योजनेमुळे अनेक महिलांनी राज्य सरकारवर विश्वास दाखवला आहे. याच योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम अमृता फडणवीस विविध माध्यमातून करतात. त्यांनी त्यांच्या उखाण्यातही या योजनेचा उल्लेख करत महिलावर्गांचं मन जिंकले.

हेही वाचा >> Photos: उपराजधानीत देवेंद्र फडणवीस यांचं जल्लोषात स्वागत; चर्चा मात्र अमृता फडणवीस यांच्या मंगळसूत्राच्या डिझाईनची

अमृता फडणवीसांचा झक्कास उखाणा

अमृता फडणवीस म्हणाल्या, मला देवेंद्रजींच्या बहि‍णींना भेटून छान वाटतं. आज हळदीकुंकू ठेवलं आहे, त्यानिमित्ताने मी त्यांच्यासाठी चार ओळी म्हणणार आहे”, असं म्हणत अमृता फडणवीसांनी उखाणा घेतला. त्या म्हणाल्या, “आज माझ्या नणंदा दिसत आहेत खास, देवेंद्रजी तुमच्या पाठीशी आहेत, प्रगती व्हावी तुमची झक्कास.”

अमृता फडणवीसांनी महिलांना दिला जगण्याचा मंत्र

“माझ्या जीवनात मला जे ठीक वाटलं, मी माझ्या मुलीकरता वाट मोकळी करू शकेन असं वाटलं, ते मी केलं. लग्नानंतर गाणं, नाचणं, बँकिंग सर्व चालू ठेवलं. पण मला कोणीही टोमणे मारले तर मी फक्त हसायचे. आणि पुढे निघून जायचे”, असं म्हणत अमृता फडणवीसांनी महिलांना मनमुरादपणे जगण्याचा सल्ला दिला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काळात अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांना चांगली साथ दिली. त्यांनी मतदारसंघातील विविध भागात जाऊन जनतेशी संवाद साधला होता. तळागाळातील महिलांशीही त्यांनी चर्चा केली होती. तसंच, राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी ठरलेली लाडकी बहीण योजनेचाही त्यांनी चांगल्याप्रकारे प्रचार केला होता. महिला वर्गांमध्ये जाऊन त्यांनी संवाद साधल्याने महिलांमध्ये त्यांच्याप्रती विश्वास निर्माण झाला. त्यामुळे त्यांना आता विविध कार्यक्रमांना खास आमंत्रण दिलं जातं. त्याही उत्साहाने अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. असे कार्यक्रम माझ्या फार जवळचे असतात, असंही त्या एकदा म्हणाल्या होत्या. तसंच, देवेंद्र फडणवीस यांच्या विजयी मिरवणुकीतही त्या दिसल्या होत्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis wife amruta fadnavis new marathi ukhana in haldikunku program sgk