ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “जे प्रकल्प विरोधकांच्या काळात गेले त्याचं पाप आमच्या माथी मारलं जात आहे” असा आरोप शिंदे यांनी केला आहे. “एवढा मोठा प्रकल्प दोन ते तीन महिन्यात इकडून तिकडे जाऊ शकतो का? ही काय जादूची कांडी आहे का? बोलण्याला पण काही अर्थ असला पाहिजे” असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

“शिंदे सरकारचं आणखी एक अपयश”, ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प राज्याच्या हातून गेल्याने सुप्रिया सुळेंचं टीकास्र!

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

“राज्यात उद्योग आणण्यासाठी उद्योगमंत्र्यांचे प्रयत्न सुरू आहे. या राज्यातून एकही प्रकल्प जाऊ नये, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे”, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रकल्पावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सुप्रिया सुळेंना सुनावले आहे. “केंद्र सरकार वेगवेगळ्या राज्यांमध्ये योजना राबवत असते. सर्व राज्यांकडून प्रस्ताव मागवले जातात. प्रत्येकवेळी प्रकल्प महाराष्ट्रातून जात आहे हा कांगावा करणं चुकीचं आहे. यामुळे महाराष्ट्राची तर बदनामी होतेच, शिवाय जे अधिकारी या प्रकल्पासाठी पाठपुरावा करतात तेही निराश होतात”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या आहेत?

सुप्रिया सुळेंनी ‘लोकमत’ आणि ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्ताचा हवाला देत, ऊर्जा निर्मिती प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची टीका केली आहे. “महाराष्ट्र सरकारचे आणखी एक अपयश…राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे ‘वेदान्त फॉक्सकॉन’, ‘बल्क ड्रग्ज पार्क’ आणि ‘टाटा एअरबस’ हे तीन मोठे प्रकल्प या सरकारच्या डोळ्यांदेखत गुजरातला गेले आहेत. यानंतर आता ‘ऊर्जा उपकरण निर्मिती झोन’ प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर…” असं ट्वीट त्यांनी केलं आहे. हा प्रकल्प मध्य प्रदेशात गेल्याचं वृत्त ‘लोकमत’ने दिलं आहे.

मुंबई: आणखी एका प्रकल्पावरून वाद; विद्युत उपकरण उद्योग मध्य प्रदेशला

राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेपासून मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार हिरावला गेला आहे. या मुद्द्यावरुन विरोधकांकडून राज्य सरकारला घेरलं जात आहे. तर हे प्रकल्प महाविकासआघाडी सरकारच्या काळातच राज्याबाहेर गेल्याचा दावा शिंदे सरकारकडून करण्यात येत आहे.