दरवर्षी दसऱ्याला दादरमधील शिवाजी पार्क मैदानामध्ये होणारा दसरा मेळावा यंदा शिंदे गटाकडून आयोजित केला जाणार की उद्धव ठाकरे गटाकडून आयोजित केला जाणार यासंदर्भातील दावे-प्रतिदावे केला जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात सूचक विधान केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शुक्रवारी मुंबईमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानी गणपती दर्शनसाठी हजेरी लावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांना तसेच राणे यांना या दसरा मेळाव्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावरील राणेंचं उत्तर ऐकून मुख्यमंत्री शिंदेंच्या चेहऱ्यावर हास्य खुलल्याचं दिसून आलं.

नक्की वाचा >> मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना आणखीन एक धक्का; राज्यपालांना पाठवलं पत्र, राज्यपाल कोश्यारींनी ‘ती’ मागणी केली मान्य

शिंदे यांनी केंद्रीय लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जुहूतील ‘अधिश’ या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणेही उपस्थित होते. या भेटीनंतर राणे यांच्या घराबाहेरच दोन्ही नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “दसरा मेळावा जवळ येतोय तर बाळासाहेबांचे दोन शिवसैनिक एकाच व्यासपीठावर दिसतील का?” असा प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शिंदे यांनी, “आता गणपती आहे. नंतर नवरात्रौत्सव येतोय. त्यानंतर दसरा आहे. आता मध्ये नवरात्री आहे ना? तुम्हाला एकदम सांगितलं तर कसं चालेल,” असं हसून उत्तर दिलं.

Vishnu Bhangale suspended from the Thackeray group, is now Jalgaon district head of Shinde group
जळगावमध्ये ठाकरे गटातून निलंबित, विष्णू भंगाळे आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
Suresh Dhas
Suresh Dhas : …अन् भरसभेत सुरेश धसांनी आकाचा फोटोच दाखवला; म्हणाले…
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”
forest minister ganesh naik slams eknath shinde working style during cm tenure
शिंदेशाहीतील चुकांची उजळणी करत नाईकांचे वर्चस्वाचे संकेत
sanjay gaikwad controversial statement
Sanjay Gaikwad: “तुमच्यापेक्षा तर रांXX बऱ्या”, शिंदे गटाच्या आमदाराची मतदारांनाच शिवीगाळ, भर सभेत जीभ घसरली!

नक्की वाचा >> गणपती दर्शनासाठी CM शिंदे नारायण राणेंच्या घरी; दर्शनानंतर भेटीदरम्याच्या चर्चेबद्दल बोलताना म्हणाले, “बाळासाहेबांच्या…”

“एक इच्छा तुम्ही व्यक्त केली होती. दसरा मेळाव्याला मुख्यमंत्र्यांनी आमंत्रित करावं अशी तुम्ही इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा आजच्या भेटीत बोलून दाखवली का?” असा प्रश्न दसरा मेळाव्यासंदर्भात राणेंना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “काही गोष्टी ओपन नाही करायच्या. त्याचवेळी करु ना आपण. एकाच दिवशी एवढ्या सगळ्या बातम्या देणं. पुढे काही ब्रेकिंग न्यूजला संधी नाही ना” असं राणे म्हणाले. त्यानंतर पत्रकारांनी, “दोन शिवसैनिक एका मंचावर दिसणार का महाराष्ट्राच्या जनतेला?” असा प्रश्न विचारला असता, “जनतेची इच्छा असेल तर दिसू” असं मोजक्या शब्दातील उत्तर राणेंनी दिलं.

नक्की वाचा >> चव्हाण-फडणवीस भेट, काँग्रेसचा एक गट शिंदे-भाजपासोबत जाण्याच्या चर्चेबद्दल विचारलं असता CM शिंदे म्हणाले, “असं कुठे…”

“मुख्यमंत्री सर्व जुन्या शिवसैनिकांना एकत्र करतील आणि सर्व एका व्यासपीठावर दिसतील का?” असं विचारलं असता राणेंनी हसून, “हे कुठल्या तरी ज्योतिषाला विचारुन सांगतो,” असं म्हटलं.

Story img Loader