ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं आहे. महाराष्ट्रात खंडणीखोर सरकार असून त्यांनी पैसे गोळा करण्यासाठी अनेक एजंट नेमले आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. राऊतांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी मातोश्रीवर पैसे दिले. संजय राऊतांसारखी लोक एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या तुकड्यावर मोठे झाले आहेत, अशी टीका संजय गायकवाड यांनी केली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “…तर राहुल नार्वेकरच १६ आमदारांना अपात्र ठरवतील”, सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचं मोठं विधान

राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले, “एकनाथ शिंदे हे पैसे वसुल करणारे किंवा खंडणी घेणारे नेते नाहीयेत. ते लोकांना दोन हातांनी दान देणारे आहेत. त्यांनी ‘मातोश्री’वर किती पैसे दिले असतील, हे त्यांनाच माहीत नसेल. त्यामुळे संजय राऊतांसारख्या माणसाने आरोप करताना हे पाहिलं पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पैशावरच त्यांच्या दुकानदाऱ्या सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या तुकड्यावर तुम्ही (संजय राऊत) मोठे झाले आहात. आता त्यांनाच तुम्ही नावं ठेवत आहात. एकनाथ शिंदे उदार मनाचा माणूस आहे, त्यांनी सगळ्यांना भरभरून दिलं आहे.”

हेही वाचा- “संजय राऊतांनी २४ तासात माफी मागावी, अन्यथा उद्धव ठाकरे…”, तुषार भोसले यांचा इशारा

संजय गायकवाड पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवर १०० टक्के पैसे दिले आहेत. त्यात काहीही नवीन नाही. अनेक नेत्यांनी मातोश्रीवर पैसे दिले आहेत.” तुम्हीही मातोश्रीवर पैसे दिले होते का? असं विचारलं असता गायकवाड म्हणाले, “माझी तेवढी औकात नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde and other shivsena leaders give money to matoshree many times sanjay gaikwad claim rmm