मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या ३६ लाख शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार नुकसानग्रस्तांना एकूण साडेचार हजार कोटींचे वाटप सुरू झाले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राज्यात २० हजार पोलिसांची भरती होणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

बाळासाहेब, वाघ, शिवसेनेसह धनुष्यबाण; एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यावर सगळी चित्रे झळकली

सततच्या पावसामुळे निकषांमध्ये न बसणाऱ्या ठिकाणांवरदेखील पंचनामे करण्यात आले आहेत. यानुसार सहा लाख शेतकऱ्यांना ७५५ कोटींची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. “एनडीआरएफच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना १५०० कोटींचे वाटप झाले असते, मात्र शिंदे-फडणवीस सरकारने साडेचार हजार कोटींचे वाटप केले” असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

बाळासाहेबांचा आवाज, हिंदवी तोफ अन्…; CM शिंदेंनी शेअर केला स्वत:चा ‘एकलव्य’ असा उल्लेख ‘शिवसेना दसरा मेळाव्याचा’ टीझर

‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे देणाऱ्यांना माफ केले जाणार नाही. देशविरोधी कृत्य करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले आहेत. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे नेण्याची आमची भूमिका दसरा मेळाव्यात दिसेल, असेही शिंदेंनी म्हटले आहे.

Story img Loader