मुंबई : मागील काही काळापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा खोळंबा झाला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याबाबत कोणतीही माहिती वा शक्यता अद्याप समोर आली नाही. असं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातून नवीन पदांसाठी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये अनेक नेत्यांची वर्णी लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. कामगार नेते किरण पावसकर यांची शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांची शिंदे यांनी सचिव पदावर नियुक्ती केली आहे.

हेही वाचा- “अख्खा महाराष्ट्र बेवारस असताना…” मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीवरून यशोमती ठाकूर यांची बोचरी टीका

याआधी जाहीर केल्याप्रमाणे आमदार दीपक केसरकर हेच पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून कायम राहणार आहेत. याशिवाय शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील, आमदार उदय सामंत, किरण पावसकर आणि दहिसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे. याचबरोबर अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाचवा दिल्ली दौरा, आज सायंकाळी होणार रवाना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ही नियुक्तीपत्रे किरण पावसकर आणि संजय मोरे याना देण्यात आली. तर बाकी पदाधिकाऱ्यांना लवकरच नियुक्तीपत्रे देण्यात येतील. या नियुक्त्यामुळे पक्षाचे काम अधिक जोमाने करता येणे शक्य होणार असून पक्ष विस्तारासाठी देखील हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.