कोल्हापूर : लाडक्या बहिणींच्या शुभेच्छांमुळे ही योजना सुपरहिट ठरली आहे. यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला आहे. काही सावत्र भाऊ ही योजना बंद पडावी म्हणून न्यायालयात गेले आहेत. हा एकनाथ शिंदे तुरुंगात जाईल, पण ही योजना कधीही बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिरोळ येथे महायुती व राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ लाडक्या बहिणींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या वेळी त्यांनी शिरोळ तालुक्यातील १ लाखाहून अधिक बहिणींना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. अशा भावाला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन केले.

हेही वाचा…Assembly Election: भाजपाने अखेर बंडखोरांना हिसका दाखवला; ४० नेत्यांवर उगारला कारवाईचा बडगा

u

शिंदे पुढे म्हणाले, की राज्य शासनाने महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. त्याला महिलांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. विरोधक ही योजना बंद करून चौकशी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत, हे दुर्दैव आहे. निवडणुकीत साथ दिली तर लाडकी बहीण योजनेची रक्कम तीन हजार रुपये करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.