वाई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वरच्या आपल्या दौऱ्यात बदल करून दुपारी साताऱ्यात येत खासदार उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी जलमंदिर पॅलेसमध्ये मुख्यमंत्र्यांचे शाही थाटात स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत खास तलवार भेट दिली.
यावेळी उदयनराजेंच्या मातोश्री कल्पना राजे भोसले पत्नी दमयंतीराजे भोसले,आमदार महेश शिंदे, सुनील काटकर, पंकज काका धुमाळ गीतांजली कदम, रंजना रावत, श्रीकांत आंबेकर, सुजाता राजे महाडिक, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांत विविध विषयांवर चर्चा झाली. महाबळेश्वरला विभागीय नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनाला जाण्यापूर्वी आपल्या दौऱ्यात बदल करत सातारा येथे उदयनराजेंना खास वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री विशेष हेलिकॉप्टरने साताऱ्यात दाखल झाले आणि उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आणखी वाचा-“लोकसभेला शिवसेनेच्या जागा कमी होणार?” गजानन कीर्तिकर म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्रात आमची…”
या वेळी खासदार उदयनराजे भोसले आणि राजमाता कल्पनाराजे भोसले, दमयंतीराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. भवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी खासदार उदयनराजेंना पुष्पगुच्छ, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, कंदी पेढे आणि तलवार भेट दिली. खासदार उदयनराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जलमंदिर पॅलेसमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राजेंचा वाढदिवस असल्यामुळे सकाळपासून मोठी गर्दी होती. त्यात मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावल्यामुळे वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा उत्साह चांगलाच वाढला होता .
या प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवछत्रपतींचे वारसदार असलेल्या उदयनराजे भोसलेंना वाढदिवसानिमित्ताने तलवारीची भेट दिली. या वेळी पालकमंत्री शंभूराज देसाईं उपस्थित होते. यावेळी त्यांनी उदयनराजेंना ‘महाराजसाहेब ही मुख्यमंत्र्यांची तलवार आहे, ही संग्रही ठेवा वार करू नका, असे सांगितले आणि ते जोरात हसले. असा सल्ला दिला. ही मुख्यमंत्र्यांची तलवार आहे जपून ठेवा, संग्रही ठेवा,वार करू नका असे म्हणाले आणि आणि ते जोरात हसले. त्यामागे काय राजकारण आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तरीही शंभूराज देसाईंच्या या वक्तव्याची चर्चा होत होती.
मुख्यमंत्र्यांनी खासदार उदयनराजेंना पुष्पगुच्छ, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, कंदी पेढे आणि तलवार भेट दिली. या वेळी उदयनराजेंनी तलवार हवेत उंचावल्यानंतर जोरदार जल्लोष करण्यात आला. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांना महाराजसाहेब मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही तलवार आहे. जपून ठेवा, संग्रही ठेवा. त्यानंतर दोन्ही नेत्यांत विविध विषयांवर चर्चा झाली.उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त साताऱ्यात मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.