देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा विदेशी गुंतवणुकीच्याबाबतीत महाराष्ट्र क्रमांक एकवर होता. मात्र नंतरच्या अडीच वर्षाच्या काळात गुजरात पुढे गेला. मात्र अभिमानाने सांगतो आहे आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र पुन्हा क्रमांक एकवर गेला, असं वक्तव्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. आज मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजी नगरमध्ये पार पडते आहे. त्यातल्या कार्यक्रमात बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं आहे. आपलं सरकार हे लोकांसाठी आहे. आमच्या कार्यकाळात आम्ही एकही निर्णय कुणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी घेतलेला नाही असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेश मंडळांबाबत मोठा निर्णय

जी सार्वजनिक गणेश मंडळं शिस्तबद्ध पद्धतीने आणि नियमाने गणेश उत्सव साजरा करतात त्यांना आता दरवर्षी संमती घेण्याची गरज नाही. त्यांना आपण पाच वर्षांची संमती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच मंडप वगैरेचे पैसे घ्यायचे नाहीत, उगाच दात कोरुन पोट कशाला भरायचं असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. सण आणि उत्सव सुरु करण्यामागचा लोकमान्य टिळक यांचा हेतू अत्यंत उदात्त होता. तो हेतू ही मंडळं करत असतात. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे असंही एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशाची प्रतिमा जगात उंचावली

आपला देश प्रचंड प्रगती करतो आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था मोदींनी पाचव्या क्रमांकावर आणली. जी २० ची परिषद दिल्लीत झाली तिथे सगळ्या जगातून लोक आले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, युरोपातल्या देशांचे प्रतिनिधी सगळेच आले होते. जगाला भारतात आणण्याची जादू, जगाचं मन जिंकण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आम्हालाही अभिमान वाटला. आपला देश अर्थव्यवस्थेच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात तिसऱ्या क्रमांकावर जाईल याच्या मनात माझ्या मनात शंका नाही असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

हे पण वाचा- ‘फसवणुकीचा अमृतकाल!’ मराठवाड्यातील कॅबिनेट बैठकीवरुन ठाकरे गटाची सरकारवर टीका

पाऊस पडेल आणि कोटा पूर्ण करेल असं मला वाटतं आहे. पण सरकार आपल्या पाठीशी आहे. आम्ही एनडीआरफचचे नियम डावलून मदत दिली. १ रुपयात पिक विमा योजना दिली. केंद्र सरकारचे सहा हजार त्याचप्रमाणे राज्य सरकारही सहा हजार देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला सक्षमीकरण याला ही प्राधान्य दिलं आहे. शासकिय नोकऱ्या दीड लाखांपर्यंत आकडा जाणार आहे. यासाठी मंगल प्रभात लोढा ही स्किल डेव्हलपमेंट विभागातर्फे प्रयत्न करत आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले आणि उपस्थितांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde criticized uddhav thackeray government in his sambhaji nagar speech scj
Show comments