दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या १२ खासदारांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र सदनमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सरकार स्थापनेसह त्यांच्या सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांबाबत माहिती दिली. दरम्यान, पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना ”संजय राऊत हे दखल घेण्यासारखे नाही”, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – “शिवसेना फोडण्यामागे शरद पवार, अजित पवार”; रामदास कदमांच्या आरोपाला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर म्हणाले…

काय म्हणाले एकनाथ शिंदे

शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू असताना खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेऊन या खासदारांवर ‘ईडी’चा दबाव असल्याचे म्हटले होते. यासंदर्भात पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी संजय राऊत यांना खोचक टोला लगावला. ”संजय राऊतांचा सकाळचा शो बंद झाला आहे. ते आता दखल घेण्यासारखे नाहीत. दुसरं कोणी बोललं असतं तर दखल घेण्यासारखं होतं. मात्र, संजय राऊत दखल घेण्यासारखे नाहीत”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा – “खंजरों को गिना जब, उतनेही थे जितनों को…”, शिवसेना फुटीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं सूचक ट्वीट!

काय म्हणाले होते संजय राऊत

एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. शिंदे गट हा फुटीर गट आहे. हा गट कार्यकारिणी घोषित करू शकत नाही. शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यांना शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्याचा अधिकार नाही. शिवसेना आजही भक्कमपणे उभी आहे, असे राऊत म्हणाले होते. तसेच शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चेवर बोलताना, या १२ खासदारांवर ‘ईडी’चा दबाव असल्याचे राऊत म्हणाले होते.