राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीच्या इतर नऊ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांमध्ये अजित पवारांसह छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ अशा बड्या नेत्यांचा समावेश आहे.

अजित पवारांनी समर्थक आमदारांच्या उपस्थितीत राजभवनावर जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गट-भाजपा सरकारचे अनेक आमदार उपस्थित होते. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Delhi New CM Atishi
Delhi New CM Atishi : मुख्यमंत्री म्हणून घोषित झाल्यानंतर आतिशी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, ” दिल्लीचे एकमेव मुख्यमंत्री…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
anna hazare arvind kejriwal
Anna Hazare : “मी त्यांना आधीच सांगितलेलं…”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
jayant patil secret explosion on bhagyashree atrams entry in sharad pawar ncp
गडचिरोली : “राष्ट्रवादीतील फुटीनंतर भाग्यश्री आत्राम शरद पवारांच्या संपर्कात,”जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट
Pratap Chikhalikar, Nanded by-election,
नांदेड पोटनिवडणूक लढण्यास प्रताप चिखलीकर पुन्हा इच्छुक
amol kolhe on pm narendra modi
Amol Kolhe: “पुतळ्यानं स्वतःहूनच मान टाकली…”, पंतप्रधान मोदींच्या माफीनाम्यानंतर डॉ. अमोल कोल्हेंची कवितेमधून प्रतिक्रिया
amol mitkari on tanaji sawant
Amol Mitkari : अजित पवार गटाबाबत केलेल्या विधानावरून अमोल मिटकरींचा मंत्री तानाजी सावंतांना टोला; म्हणाले, “जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, ते…”
Devendra Fadnavis on Narayan Rane Malvan Statue collapse
Malvan Shiv sena UBT vs BJP : मालवणच्या राड्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “नारायण राणे…”

हेही वाचा- महाराष्ट्रात राजकीय महाभूकंप, अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये होणार सामील

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आज अजित पवार आणि त्यांचे काही सहकारी आमदारांनी आपल्या शिवसेना-भाजपा युतीच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील जे डबल इंजिनचं सरकार आहे, त्याला आता ट्रिपल इंजिन जोडलं आहे. आता राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे धावेल. याचा महाराष्ट्राच्या जनतेला फायदा होईल आणि राज्याचा विकास अतिशय वेगाने होईल, एवढंच मी याप्रसंगी सांगतो.”

हेही वाचा- राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार! अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ, मंत्रिमंडळात सामील झालेल्या नेत्यांची संपूर्ण यादी

मंत्रीमंडळात सामील झालेल्या नेत्यांची यादी

अजित पवार -उपमुख्यमंत्री
छगन भुजबळ – मंत्री
दिलीप वळसे-पाटील-मंत्री
हसन मुश्रीफ- मंत्री
धनंजय मुंडे- मंत्री
धर्मारावबाबा आत्राम-मंत्री
आदिती तटकरे- मंत्री
संजय बनसोडे – मंत्री
अनिल पाटील – मंत्री