आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी (१९ मे) मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने दोन हजार रुपयांच्या नोटा वितरणातून मागे घेतल्या आहेत. या नोटा अद्याप अवैध ठरवल्या नाहीत. नागरिकांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत. नागरिकांना एकावेळी दोन हजार रुपयांच्या केवळ १० नोटा (२० हजार रुपये) जमा करता येणार आहेत. “बाजारात इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत,” असं कारण देत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजारांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँकेनं घेतलेल्या या निर्णयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. आरबीआयच्या निर्णयाबद्दल विचारलं असता एकनाथ शिंदे म्हणाले, “आरबीआयने निर्णय घेतला असेल तर तो काही विचाराअंतीच घेतला असेल.” प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
kopri pachpakhadi vidhan sabha election 2024
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोराला दोन ते तीन कोटी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा गंभीर आरोप

हेही वाचा- “ठाकरे गटाला लोकसभेच्या १९ जागा मिळतील”; राऊतांच्या विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “राऊतांना त्यांच्या पक्षाची…”

खरं तर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं २००० च्या नोटा वितरणातून काढून घेतल्या असल्या तरी त्या नोटा सध्या अवैध ठरणार नाहीत. त्या आपल्याला दिलेल्या मुदतीपर्यंत जमा करता येणार आहेत. ८ नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या. त्यांच्या जागी नवीन ५०० आणि २००० च्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर २०१६ मध्ये आरबीआयने २ हजाराची नवीन नोट बाजारात आली होती. त्यानंतर आरबीआयने २०१९ पासून २ हजारांच्या नोटांची छपाईसुद्धा बंद केली होती.

हेही वाचा- RBI Withdrawn 2000 Rs: माजी अर्थमंत्र्यांचं भाकीत ठरलं खरं; आता केलं नवं भाकीत, म्हणाले…

ही नोटाबंदी आहे का?

ही नोटाबंदी अजिबात नाही. २००० रुपयांच्या नोटा पूर्णपणे वैध राहतील. त्या अद्याप बंद केल्या नाहीत. फक्त त्या सिस्टममधून काढून घेण्यासाठी वेळ दिला जात आहे. ज्या उद्देशासाठी त्या छापल्या होत्या तो आता पूर्ण झाला आहे, असे आरबीआयला वाटते.