तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर अर्थात चंद्रशेखर राव हे आज पंढरपुरात दर्शनासाठी दाखल झाले असून तिथून ते तुळजाभवानीच्या दर्शनासाठीही जाणार आहेत. त्यांच्या राजकीय शक्तिप्रदर्शनाची जोरदार चर्चा रंगत असताना दुसरीकडे राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधल्या कलगीतुऱ्याचीही चर्चा आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट ह शिवसेनेतील दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतानाच शिंदे गटाच्या नेत्यानं केलेल्या सूचक ट्वीटमध्ये राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी हे ट्वीट केलं असून त्यात ठाकरे गटाचा आणखी एक नेता शिंदे गटात दाखल होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय आहे ट्वीटमध्ये?

आपल्या ट्वीटमध्ये नरेश म्हस्केंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावताना “आज उबाठाचा आणखी एक मोहरा कमी होईल, खऱ्या शिवसेनेत येऊन विचारांची निष्ठा ठेवील”, असं म्हटलं आहे. तसेच, “सुपडा साफ होणार आणि तुमचे उखळ पांढरे होणार, ‘उठा’ तुमच्यावर लवकरच झोपायची वेळ येणार”, असा टोलाही या ट्वीटमधून नरेश म्हस्केंनी लगावला आहे. कवितेच्या स्वरूपात हे ट्वीट म्हस्केंनी केलं आहे. दरम्यान, म्हस्केंच्या या ट्वीटमुळे नेमक्या कोणत्या नेत्याबद्दल त्यांनी हे ट्वीट केल आहे? याचे अंदाज बांधले जात आहेत.

मुंबई महानगर पालिकेचा फोटो!

दरम्यान, नरेश म्हस्केंनी आपल्या ट्वीटबरोबर मुंबई महानगरपालिकेचा फोटोही ट्वीट केला आहे. त्यामुळे मुंबईतील ठाकरे गटाचा कोणता नेता शिंदे गटाबरोबर जाणार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.