राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था दीड-दोन महिन्यांपासून ढासळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था दीड-दोन महिन्यांपासून ढासळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. जालन्यात महिला आणि मुलांवर अमानुषपणे लाठीहल्ला गृहमंत्रालयाकडून करण्यात आला. कोयता गँग, ड्रग माफिया, मराठा, मुस्लीम आणि लिंगायत समाजाचे आरक्षण, अशा प्रश्नांवर सरकार अतिशय असंवेदनशील आहे. हे सगळं सरकारसह गृहमंत्रालयाचं अपयश आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा दिला पाहिजे.”

Jitendra awhad daughter Natasha Awhad
Natasha Awhad: “भाजपाला ही निवडणूक जिंकायचीच होती, कारण…”, जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा खळबळजनक दावा
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड

हेही वाचा : “आपण एका ताटात जेवलोय म्हणून सांगते…”, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सावधानतेचा इशारा; म्हणाल्या…

“खोके सरकारवर सत्ताधारी आमदारांचा विश्वास नाही”

“सत्तेतील आमदार मराठा आरक्षणासाठी राज्यपाल भवनाबाहेर आंदोलन करतात. याचा अर्थ सत्तेतील आमदारांचा ट्रिपल इंजिन खोके सरकारवर विश्वास राहिला नाही. सरकारनं तातडीनं विधानसभा अधिवेशन घ्यावे,” अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.

“गल्ली ते दिल्ली भाजपाचं सरकार, पण…”

“‘धनगर समाजाला पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीत आरक्षण देऊ,’ असं फडणवीस आमच्या घराबाहेर येऊन म्हणाले होते. १० वर्षापासून गल्ली ते दिल्ली भाजपाचं सरकार आहे. पण, आरक्षण दिलं नाही. सतत सर्व समाजाचा अपमान करण्याचं काम भ्रष्ट जुमला पार्टीचं खोके सरकार करत आहे,” असं टीकास्र सुप्रिया सुळेंनी डागलं.

हेही वाचा : “फडणवीसांनी चर्चेला यावं, मराठे संरक्षण देतील”, सर्वपक्षीय बैठकीनंतर जरांगेंचं खुलं आव्हान, म्हणाले…

“फडणवीस सतत खोटे बोलतात”

“राज्यातील महिला सुरक्षित नाहीत. मराठा, लिंगायत, मुस्लीम समाजाला धोका देण्याचं काम केलं. याला गृहमंत्री फडणवीस जबाबदार असून ते सतत खोटे बोलत आहेत,” असा आरोपही सुप्रिया सुळेंनी केला.

Story img Loader