दापोली-हण्र मार्गावरील आसूद जोळीआळीजवळ मॅगझीमो रिक्षा आणि ट्रक यांच्यात रविवारी ( २५ जून ) समोरासमोर धडक झाली होती. या घटनेत मॅगझीमो रिक्षा चालकासह ८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर, ६ प्रवासी जखमी झाले होते. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदतही जाहीर करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून अपघाताची माहिती घेतली. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचं निर्देश एकनाथ शिंदेंनी दिले. तसेच, जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा : आषाढी यात्रेच्या तयारीची मुख्यमंत्री शिंदेंनी केली पाहणी

नेमकं काय घडलं?

रविवारी दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. मॅगझीमो रिक्षा (एमएच-०८-५२०८) दापोलीतून आंजर्लेकडे जात होती. तेव्हा आसूद जोशीआळी येथील वळणावर समोरून येणाऱ्या ट्रकवर मॅगझीमो रिक्षा आदळली. ट्रक वेगात असल्यामुळे मॅगझीमो रस्त्याच्या डाव्या बाजूला फरपटत काही अंतरावर गेली. हा अपघात एवढा भयानक होता की, मॅगझीमोचा चक्काचूर झाला. या गाडीतील पाच जण जागीच, तर दोघांचा रुग्णालयात आणि एका महिलेचा डेरवण येथे नेत असताना मृत्यू झाला.

अपघात घडताच ट्रक चालक व क्लीनर यांनी अपघातस्थळावरून पळ काढला. त्यांचा शोध दापोली पोलीस घेत आहेत.

हेही वाचा : सत्ताधाऱ्यांमुळे मुंबई पालिकेचे पैसे वाचविण्याबरोबरच अपघात टळले असते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

अपघातातील मृतांची आणि जखमींची नावे

या अपघातात चालक अनिल सारंग (वय ४५, रा. हण्र), संदेश कदम (५५), स्वरा संदेश कदम (८), मारियम काझी (६४), फराह काझी (२७, सर्व रा. अडखळ), मीरा महेश बोरकर (वय २२, रा. पाडले), वंदना चोगले (३४, रा. पाजपंढरी), सामीया इरफान शिरगांवकर अशा आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सपना संदेश कदम (वय ३४, रा. अडखळ), श्रद्धा संदेश कदम (१४, रा. अडखळ), विनायक आशा चोगले (रा. पाजपंढरी), भूमी सावंत (१७), मुग्धा सावंत (१४), ज्योती चोगले (९, रा. पाजपंढरी) यांच्यावर उपजिल्हा व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde help dapoli truck and rikshaw accident death people family five lakh ssa