शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच दिल्लीत जाऊन संबंधित खासदारांसमवेत बैठक घेतली होती. यानंतर त्यांनी १२ खासदारांसह एक पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. दिल्लीत पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठीतून संवाद साधत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी हिंदी भाषेतूनही संवाद साधावा, अशी मागणी हिंदी भाषिक पत्रकारांनी केली. तसेच मराठीतूनच बोलायचं होतं तर मुंबईला पत्रकार परिषद घ्यायला हवी, असा टोला एका पत्रकाराने लावला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित पत्रकाराला कोणताही जाब विचारला नाही अथवा प्रत्युत्तर दिलं नाही, अशी टीका काँग्रेसनं केली. काँग्रेसनं संबंधित पत्रकार परिषदेतील व्हिडीओचा काही भाग शेअर करत ही टीका केली आहे.

एका मुख्यमंत्रीपदासाठी अजून किती लाचारी पत्करणार? असा सवालही काँग्रेसनं विचारला आहे. काँग्रेसनं आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं की, ” ५ हजारी मनसबदाराचा दिल्ली दरबारी चांगलाच पाणउतारा चाललाय! महाराष्ट्राचा आणि मराठीचा खुलेआम अपमान सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी तोंडातून चकार शब्द देखील काढला नाही. शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राची मान शरमेने अजून किती खाली घालणार? एका मुख्यमंत्रीपदासाठी अजून किती लाचारी पत्करणार?”