गेल्या १७ दिवसांपासून चालू असलेलं मनोज जरांगे पाटील यांचं बेमुदत उपोषण अखेर मागे घेण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून शिष्टमंडळानं आधीच मनोज जरांगे पाटलांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा केली होती. शेवटी मराठा आरक्षणासाठी सरकारला एक महिन्याचा कालावधी देण्याचंही मनोज जरांगे पाटलांनी मान्य केलं. मात्र, स्वत: मुख्यमंत्री भेटायला आल्याशिवाय मी उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला होता. अखेर आज मुख्यमंत्र्यांनी सराटी गावात जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्याच हस्ते ज्यूस पिऊन जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं.

“मी तुम्हाला उपोषण सोडण्याची विनंती केली आणि तुम्ही माझ्या हातून सरबत घेतलं यासाठी तुमचे व तुमच्या सहकाऱ्यांचे धन्यवाद. शासनाची भूमिका स्पष्ट आहे. यापूर्वीही सरकारने मराठा समाजाला १६ व १७ टक्के आरक्षण दिलं होतं. त्यावेळी आपण अध्यादेश काढला, तेव्हा उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली.नंतर आपण कायदा केला. १२ व १३ टक्के आरक्षणाचा मुद्दा उच्च न्यायालयातही टिकला. पण दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात ते रद्द झालं. ते का झालं, कसं झालं यावर मी बोलू इच्छित नाही”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
delivery boy
“डिलिव्हरी बॉयचा संघर्ष कधीच कुणाला दिसत नाही!” VIDEO होतोय व्हायरल; नेटकरी म्हणाले ” डिलिव्हरी बॉयचा आदर करा”
Emotional message for father
“डोळ्यातले अश्रु डोळ्यांतच जिरवण्याची ताकद फक्त ‘बापाकडे’ असते” तरुणाची पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Sanju Samson father Viswanath video viral
Sanju Samson : ‘३-४ लोकांमुळे माझ्या मुलाची १० वर्षें वाया गेली…’, संजू सॅमसनच्या वडिलांचे धोनी-विराटसह रोहित शर्मावर गंभीर आरोप, VIDEO व्हायरल
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?

“मी म्हणालो, जे होईल ते होईल, पण…”

यावेळी मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांशी चर्चा करून त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं. माध्यमांशी बोलताना राज्य सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याच्या भूमिकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुनरुच्चार केला. “मराठा आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे. पण मराठा आरक्षण रद्द झालं, तेव्हा ३ हजार ७०० मुलांच्या मुलाखती झाल्या होत्या. पण नोकऱ्या मिळाल्या नव्हत्या. पण त्यांना नोकऱ्या देण्याचं धाडस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कुणी करत होतो. पण मी सांगितलं, जे होईल त्याला तोंड देण्याची जबाबदारी सरकारची व मुख्यमंत्री म्हणून माझी आहे. त्यांना आपण नोकऱ्या देऊ. आम्ही नोकऱ्या दिल्या. ते आता नोकरीवर आहेत”, असं एकनाथ शिंदेंनी यावेळी नमूद केलं.

“मी अनेक वर्षं मनोजला ओळखतो, त्यानं…”

यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे कुटुंबीयही आंदोलनस्थळी उपस्थित होते. मनोज जरांगे पाटलांच्या वडिलांनाही एकनाथ शिंदे यांनी ज्यूस प्यायला दिला. यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांचे आभार मानले. “मी त्यांच्या बाबांना सांगितलं मघाशी, तुमचा पोरगा भारी आहे. स्वत:साठी नाही, समाजासाठी तो लढतोय. मनोजला मी गेली अनेक वर्षं ओळखतो. त्यानं कोणताही प्रश्न वैयक्तिक फायद्यासाठी कधी मांडला नाही. जेव्हा जेव्हा तो मला भेटला, त्या त्या वेळी मराठा समाजाबद्दल, आरक्षणाबद्दल त्यानं सरळ भूमिका मांडली. मी मनोजचं मनापासून अभिनंदन करतो”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“दिल्लीत मला विचारलं, ये मनोज जरांगे कौन है”, एकनाथ शिंदेंनी ‘तो’ किस्सा सांगताच उपस्थितांमध्ये हशा…

“एखादं आंदोलन करणं आणि आमरण उपोषण करणं, जिद्दीनं ते पुढे नेणं आणि त्याला जनतेचा प्रतिसाद मिळणं या गोष्टी कमी वेळा पाहायला मिळतात. पण ज्याचा हेतू शुद्ध असतो, प्रामाणिक असतो, त्याच्या मागे जनता खंबीरपणे उभी राहाते. त्यामुळेच पहिल्या दिवसापासून लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिला व मराठा आरक्षणाची प्रामाणिक भूमिका घेऊन तुम्ही लढत आहात.