विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पाहायला मिळत आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी केलेल्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान टोलेबाजी करत विरोधकांना लक्ष्य केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसची अवस्था पाहून दया येत असल्याचं म्हटलं. तसेच, एका कवितेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर कोटी करताच सभागृहात एकच हशा पिकला!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी सभागृहात नसलेल्या नाना पटोलेंचा देखील मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. “काँग्रेसचे नाना पटोले इकडे नाहीत. बाळासाहेब (थोरात) आहेत. पण काय परिस्थिती झालीये काँग्रेसची? काँग्रेसची बिचाऱ्यांची आधीही समस्या होतीच. आधी बाळासाहेब माझ्याकडे बोलायचे की हे सगळं काय चाललंय. मी त्यांना बोलायचो की माझ्या हातात सगळं नाहीये ना. माझ्या हातात सगळं असतं तर मी केलं असतं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी एकनाथ शिंदेंनी एका कवितेच्या माध्यमातून काँग्रेसला चिमटा काढला. मुख्यमंत्री म्हणाले…

आता काँग्रेसची स्थिती पाहून येते दया..
महाविकास आघाडीची पुरती गेली रया..
दादा आणि अंबादास बसले..
काँग्रेसवाले हात चोळत बसले
तेव्हा इंदिराबाईंच्या हाताची एकेकाळी होती वट
टोमणे सेनेबरोबर आता झाली नुसती फरफट…

पाहा व्हिडीओ –

मुख्यमंत्र्यांनी कविता संपवताच सभागृहात हशा पिकला. विरोधी बाकांवर बसलेल्या आमदारांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या या कवितेला मनमोकळेपणे हसून दाद दिली. “इकडे अजित पवार आणि वर अंबादास. विरोधी पक्षनेते ठरवताना तुम्हाला विचारलंच नाही यांनी” असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच बाळासाहेब थोरात यांनी “ती आमची आघाडीतली बाब आहे”, असं म्हणत सारवासारव केली. मात्र, त्यावर “तुम्ही जाहीरपणे बाहेर बोलले आहात की आम्हाला विश्वासात घेतलं नाही”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब थोरातांना आठवण करून दिली.