राज्य विधिमंडळ अधिवेशनामध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांसोबतच बाहेरून काही राजकीय नेतेमंडळीदेखील अधिवेशनातील मुद्द्यांवरून टीका करताना दिसत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत केलेल्या एका टीकेवरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, ‘आपण कंत्राटी मुख्यमंत्रीच आहोत’ असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्यामुळे आता या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंनी राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका करताना त्यांचा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री असा केला होता. तसेच, दुसऱ्या पक्षातून आमदार-खासदार चोरणं हाच यांचा एककलमी कार्यक्रम झालाय, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली. “यांचा एककलमी कार्यक्रम आहे की दुसऱ्या पक्षातून नेते आणा..आमदार-खासदार आणा. तेही पुरत नाहीत म्हणून दुसऱ्या पक्षातून पक्षप्रमुख चोरा. स्वत:ला स्वप्नंही पडत नाहीत. त्यामुळे दुसऱ्यांची स्वप्नंही चोरा”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर

दरम्यान, यावर बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. “आज माझा उल्लेख झाला कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून.. राज्याचा कुणीही मुख्यमंत्री असू द्या.. जेव्हा राणेंनी कुठेतरी भाषणात मुख्यमंत्र्यांबद्दल काहीतरी उल्लेख केला होता. त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकलं. केंद्रीय मंत्री असलेला माणूस. जेवायला बसला होता. त्याला जेवूही दिलं नाही. का, तर मुख्यमंत्र्यांविरुद्ध अपशब्द वापरले. आता कंत्राटी मुख्यमंत्री म्हणाले आहेत. या देशाच्या लोकशाहीत घटनेप्रमाणे आम्ही इथे बहुमत सिद्ध करून बसलो आहोत. उगाच बसलो नाहीत. नाहीतर न्यायालयाने आम्हाला काढून टाकलं असतं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“तेव्हा इंदिराबाईंच्या हाताची होती वट, आता टोमणे सेनेबरोबर…”, मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत कवितेतून काँग्रेसला खोचक टोला!

“हो, मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे”

“वैचारिक पातळी एकदम खालावली आहे. घसरली आहे. हो मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्राच्या विकासाचं कंत्राट मी घेतलं आहे. हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. लोकांचं दु:ख दूर करण्याचं कंत्राट मी घेतलंय. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. बहुजनांच्या सर्वांगीण विकासाचंही मी कंत्राट घेतलं आहे. असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा”, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी यावेळी लगावला.

पाहा व्हिडीओ –

“विरोधी पक्षाने मुद्दे मांडायला हवेत. राज्याच्या हिताचे मुद्दे मांडले पाहिजेत. आता विरोधकांकडे मुद्देच नाहीत. त्यामुळे वैचारिक दिवाळखोरीतून केवळ हिणवणे असंच सुरू आहे. पण आम्ही त्यावर कामाने उत्तर देणार. प्रत्येकाने आपली मर्यादा सांभाळली पाहिजे”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी चारोळीच्या माध्यमातून विरोधकांना खोचक टोला लगावला.

“हा पक्ष आहे की चोरबाजार?” उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला; म्हणाले, “यांना स्वप्नंही पडत नाहीत म्हणून…!”

एकनाथ शिंदे म्हणाले…

जीवन उसी का मस्त है, जो समाज की उन्नती में व्यस्त है
परेशान वही, जो दुसरों की उन्नती में त्रस्त है!

Story img Loader