शिवसेनेच्या बंडखोर नेते गद्दार असल्याचं वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आज ज्येष्ठ शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तीकर यांची गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे यांना आदित्य ठाकरेंनी बंडखोर गद्दार असल्याची टीका केल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला शिंदे यांनी सविस्तर उत्तर देताना आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
नक्की वाचा >> शिंदे गटाकडून शरद पवार, अजित पवारांवर का टीका केली जातेय?; रोहित पवार उत्तर देताना म्हणाले, “त्यांच्यावर खापर फोडलं तर…”
आदित्य नेमकं काय म्हणाले?
“आम्ही शिवसेनेच्या खासदार- आमदारांवर अंधविश्वास ठेवला. तर त्यांनी आमच्याच पाठीत खंजीर खुपसला. जे गेले त्यांच्या रक्तात कधीच शिवसेना नव्हती. आयुष्यभर त्यांच्या कपाळावर गद्दाराचा ठपका असेल”, अशी टीका शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. भिवंडीत आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमातील भाषणामध्ये आदित्य यांनी हे वक्तव्य केलेलं.
नक्की वाचा >> “आपणच मुख्यमंत्री आहोत हे एकनाथ शिंदेंना सिद्ध करुन दाखवावं लागेल”
“४० पेक्षा जास्त आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी करत भाजपाशी हातमिळवणी केली आणि सरकार स्थापन केले. मात्र, हे सरकार घटनाबाह्य असून ते लवकरच कोसळणार आहे,” असा दावाही आदित्य यांनी केला. तसेच, “बंडखोर आमदारांकडून आम्ही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उठाव केला, बंड केला अशी वाक्ये सतत वापरण्यात येत आहेत मात्र, मुळात हा बंडच नसून गद्दारी आहे आणि ही केवळ राजकीय गद्दारी नाही तर माणूसकीशी केलेली गद्दारी आहे,” अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
नक्की वाचा >> “शिंदे-भाजपा सरकार म्हणू नका…”, ‘त्या’ प्रश्नावर चिडले मुनगंटीवार; घराणेशाहीवरुन टीका करत म्हणाले, “पक्ष कार्यकर्त्यांचा की…”
मुख्यमंत्री काय म्हणाले?
“शिवसेनेचे बंडखोर हे गद्दार आहेत. त्यांच्या रक्तात शिवसेना नाहीय,” असं आदित्य म्हणाले असल्याचं सांगत पत्रकाराने शिंदे यांना यावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर शिंदेंनी, “त्यांना काय बोलायचंय ते बोलू द्या. आम्ही आमचं काम करतोय,” असं उत्तर दिलं. पुढे बोलताना शिंदे यांनी, “आम्ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पुढे नेण्याचं काम करतोय. महाराष्ट्रातील जनतेला आमची भूमिका पटलेली आहे. म्हणूनच आमच्यासोबत ५० आमदार लोकसभेच्या १२ खासदारांनी या भूमिकेचं समर्थन केलंय. यावरुन आपल्याला कल्पना आली पाहिजे की जी भूमिका आणि विचार बाळासाहेबांची होते ते आम्ही आत्मसात केलेत,” असं सांगत आपल्याकडे बहुमत असल्याचं अधोरेखित केलं.
नक्की पाहा >> Photos: “उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या आदेशानेच पवारांवर पातळी सोडून टीका”; बापाचा उल्लेख करत अजित पवारांनी इशारा दिलेल्या नेत्याचा गौप्यस्फोट
तसेच पुढे बोलताना, “जे युतीचं सरकार अडीच वर्षांपूर्वी घडायला पाहिजे होतं ते आता घडलंय. जे बाळासाहेबांना हवं होतं, जी बाळासाहेबांची भूमिका होती ती घेऊन आम्ही पुढे चाललोय,” असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.