CM Eknath Shinde On Akshay Shinde Encounter : बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांकडील बंदूक हिसकावरू घेत पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत, तर अक्षय शिंदे याने केलेल्या गोळीबारानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदे ठार झाल्याची माहिती सांगितली जात आहे. या चकमकीत सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे जखमी झाले आहेत. ठाणे क्राइम ब्रॅचच्या टीमकडून आरोपी अक्षय शिंदे याला तपासासाठी घेऊन जात असताना ही घटना घडली. दरम्यान, या घटनेवर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय शिंदे याने गोळीबार केला, त्यावेळी नेमके काय घडले? याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

“बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेच्या पहिल्या पत्नीने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्या संदर्भातील तपासासाठी पोलीस त्याला घेऊन जात होते. याच दरम्यान अक्षय शिंदे याने एपीआय निलेश मोरे यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये पोलीस अधिकारी निलेश मोरे हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मला समजली आहे. या सर्व घटनेबाबत पोलीस तपासानंतर अधिक माहिती समोर येईल”, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.

anna hazare arvind kejriwal
Anna Hazare : “मी त्यांना आधीच सांगितलेलं…”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
CM Mamata Banerjee at JR doctors protest place near Swasthya
Kolkata Rape Case : “हा माझा शेवटचा प्रयत्न”, आंदोलकांच्या भेटीला गेलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा आंदोलक डॉक्टरांना इशारा!
conversion
Triple Talaq : आधी धर्मांतर, मग तीन तलाक; उत्तर प्रदेशात धर्मांतरविरोधी कायदा असतानाही कशी झाली महिलेची फसवणूक?
case registered against two people,young man died due to electric shock in pune
पुणे : फलक लावताना विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू, दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
Pune suicide, wife s affair, Pune Man Commits Suicide Lonikand police, abetment to suicide, complaint, investigation
पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे तरुणाची आत्महत्या, पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
shivsena thackaray
“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!

हेही वाचा : बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण : आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांवर गोळीबार; अक्षय चकमकीत ठार

बदलापूर प्रकरण नेमकं काय आहे?

बदलापूर मधील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमूरड्या मुलींवर अक्षय शिंदे याने अत्याचार केल्याची घटना घडली होती. वैद्यकीय तपासणीनंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर दोन्ही मुलींच्या पालकांनी सुरुवातीला शाळा प्रशासन आणि नंतर पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली. शाळा प्रशासनाने या घटनेकडे दुर्लक्ष करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता. तसेच पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल करताना दिरंगाई केल्याचा आरोपही झाला होता. त्यानंतर बदलापूरमध्ये संताप व्यक्त केला गेला होता. त्यानंतर २० ऑगस्ट रोजी बदलापुरात नागरिकांनी रेल्वे रोको आंदोलन केले होते. आंदोलकांनी जवळपास ९ तास मध्य रेल्वे वाहतूक बदलापूर रेल्वे स्थानकात रोखून धरली होती.

या सर्व प्रकरणाची चर्चा देशभरात झाली होती. बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने विशेष तपासणी समिती (एसआयटी) स्थापना केली होती. तसेच या प्रकरणात न्यायालयात बाजू मांडण्यासाठी उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच गेल्या आठवड्यात एसआयटीकडून याप्रकरणी आरोप पत्र दाखल करण्यात आले होते.