शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत पात्रा चाळ प्रकरणी सध्या सक्तवसुली संचलनालयाच्या ताब्यात आहेत. त्याच प्रकरणामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मंगळवारी केली. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अप्रत्यक्षपणे या मागणीला पाठींबा दिला. असं असतानाच मंगळवारी रात्री जळगावच्या दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात भाष्य केलं.
नक्की वाचा >> पत्रा चाळ प्रकरण: पवारांच्या चौकशीच्या मागणीला BJP चा पाठिंबा? पक्षाची भूमिका मांडताना प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “…तर गृहमंत्री चौकशी करतील”
जवळ जवळ १ हजार ३९ कोटींच्या पत्रा चाळ प्रकरणावरुन अतुल भातखळकर यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं असून यामध्ये त्यांनी शरद पवार यांचीही चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे. पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कार्यालयामध्ये म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत संजय राऊतांच्या उपस्थितीत पत्रा चाळसंदर्भात बैठका झाल्या. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखही उपस्थित असल्याचा संदर्भ ही दिला जात आहे. याच रप्रकरणाबद्दल जळगाव दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शिंदेंनी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं.
नक्की वाचा >> विश्लेषण : राऊतांच्या संपत्तीवर जप्ती आणणारं १०३९ कोटींचं पत्रा चाळ प्रकरण नेमकं काय? कोणी आणि कसा वळवला पैसा?
“पत्रा चाळ प्रकरणी शरद पवारांचं नाव समोर आलेलं आहे. त्यांच्या चौकशीची देखील आता भाजपाकडून मागणी केली जात आहे. तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे?” असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी, “नाही, त्याची मी माहिती घेतो. मला माहिती घेऊ द्या. त्यानंतर मी नक्की बोलेन,” असं उत्तर दिलं. त्यानंतर पत्रकारांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखही या बैठकीला उपस्थित असल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारला. “तत्कालीन मुख्यमंत्री आणि शरद पवार दोघांचं नाव आहे,” असं पत्रकाराने म्हटलं. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी, “नाही, म्हणून मी त्या बाबतीत माहिती घेऊन नक्कीच आपण सविस्तर बोलू,” असं उत्तर दिलं.
नक्की वाचा >> ठाकरे की शिंदे? दसरा मेळावा वादात संजय राऊतांची उडी; म्हणाले, “परवानगी मिळाली नाही तरी शिवसैनिकांनी…”
शिवसेनेचे माजी नेते रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल केलेल्या विधानांवरुन वाद निर्माण झाल्यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावही शिंदेंनी “मी माहिती घेऊन यावर बोलेन” असं उत्तर दिलं.