वाई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शनिवारी दुपारी दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यावर आले. ते थेट आपले गाव दरे तांब (ता. महाबळेश्वर) येथे हेलिकॉप्टरने पोहोचले. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणि पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी त्यांचे स्वागत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री मागील काही दिवसांपासून आपल्या धकाधकीच्या आणि व्यस्त कामातून विश्रांतीसाठी गावी आले आहेत. मराठा आरक्षणावरून सरकारची चांगलीच कोंडी करण्याचा प्रयत्न मनोज जरांगे-पाटील यांनी केला होता. त्यांनी उपोषण स्थगित केल्याने आपला ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री गावी आले आहेत. यापूर्वी १० ऑगस्टला ते गावी आले होते. सद्या त्यांचा कोणताही कार्यक्रम, बैठका, भेटी आदी कार्यक्रम अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र सातारा जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव असून त्यादृष्टीने ते अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. याचबरोबर बांबू लागवड प्रकल्पासह स्कुबा डायव्हिंग प्रकल्पाचा ते आढावा घेणार आहेत.

हेही वाचा – ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केली? VIP उपचारासाठी मंत्र्याचे फोन आले? ससूनचे अधिष्ठाता म्हणाले…

हेही वाचा – खासदार अशोक नेतेंच्या वाहनाला भीषण अपघात, सीटबेल्ट व एअरबॅगमुळे थोडक्यात बचावले!

राज्यात बांबू लागवडीचा पथदर्शी प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून साताऱ्यातील या प्रकल्पाचाही ते आढावा घेणार आहेत. कोयना धरणात पर्यटनासाठी करावयाच्या विविध पर्यटन प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून स्कुबा डायव्हिंग प्रकल्पाचा ते आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री महाबळेश्वर तालुक्यातील आपल्या दरे गावी आल्याने प्रशासन तेथे दाखल झाले आहे. वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी बाळकृष्ण भालचिम, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्वी पाटील, महाबळेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक योगेश पाटील, पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांच्यावर येथील दौऱ्याच्या व्यवस्थेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde on his visit to satara visited dari village ssb