महायुतीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “धनुष्यबाण आला आणि पंजा कायमचा गेला. येथील जनता ७ मे रोजी धनुष्यबाणाच्या खटक्यावर बोट ठेवेल आणि विरोधकांचा टांगा पलटी घोडे फरार करेल”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले विश्वनेते आहेत. नरेंद्र मोदी यांचा कुणीही नाद करायचा नाही. आपलं ठरलं आहे, मत मोदींना आणि मत धनुष्यबाणाला. पंतप्रधान मोदी यांना मत म्हणजे देशाच्या निकासाला मत. विकासाबरोबर ते देशाचा वारसाही जपत आहेत. त्यामुळे आपण कायम म्हणतो, मोदी है तो सब मुमकिन है. या देशात गॅरंटी कुणाची चालते? बाकीच्या गॅरंटी फेल झाल्या आहेत. फक्त एकच गॅरंटी चालते, ती म्हणजे मोदींची गॅरंटी. या देशाला जगामध्ये सन्मान मिळून देण्याची गॅरंटी. शेतकऱ्यांना सक्षम करण्याची गॅंरटी. या गॅरंटीच्या आडवे येणाऱ्यांचा काट किर्रर्र झाल्याशिवाय राहणार नाही”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केला.

हेही वाचा : ‘दोन टप्प्यानंतर एनडीए २-० ने पुढे’, कोल्हापूरच्या सभेत फूटबॉलच्या भाषेत पंतप्रधान मोदींची जोरदार फटकेबाजी

“काँग्रेसचं काय चालालंय? येड्याची जत्रा आणि पेढ्यांचा पाऊस. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे फक्त आश्वासनांचे पेढे नाही तर त्यांच्याकडे गॅरंटी आहे.आपण फक्त मत माघत नाही तर काम करतो. पूर आला तेव्हा कोल्हापूरकरांचं दर्शन घडलं. त्यावेळी पहिल्या आणि दुसऱ्या माळावर पाणी शिरलं होतं. तेव्हा लोक वरती माळावर गेले होते. त्यावेळी लोक आपल्या गायी-म्हशींनाही बरोबर घेऊन गेले होते. तेव्हा त्यांना विचारलं तर ते म्हणाले हे आमचं कुटुंब आहे, म्हणून एकीकडे गो-धनाला बरोबर ठेवणारे कुठे आणि २६ जुलैच्या पुरावेळी बाळासाहेबांना मातोश्रीमध्ये एकटे सोडून फाईव्ह स्टारमध्ये जाणारे कुठे?”, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

शिवसेनेची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही

“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, शिवसेनेची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही. अशी वेळ आली तर मी माझे दुकान बंद करेन. पण आज त्यांचा मुलगा आणि परिवार काँग्रेसला मतदान करणार आहे. जनाची नाही तर मनाची तरी ठेवली पाहिजे. ज्या गोष्टींचा खेद वाटायला हवा, त्या गोष्टींचा त्यांना अभिमान वाटत आहे. आता उबाठाची शंभर टक्के काँग्रेस झाली आहे”, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde on pm narendra modi in kolhapur and rahul gandhi uddhav thackeray gkt