विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणात १० जानेवारी, अर्थात उद्या अंतिम निकाल देणार आहेत. त्याबाबत शिवसेनेतील शिंदे गट व ठाकरे गट यांच्याकडून परस्परविरोधी प्रतिक्रिया व दावे समोर येत आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापल्याचं दिसत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात सूचक विधान केलं आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. आज सकाळी माध्यम प्रतिनिधींनी एकनाथ शिंदेंना उद्याच्या निकालाबाबत विचारणा केली असता त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागेल, असे सूतोवाच केले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून राज्यात चर्चा आहे ती शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची. मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या निकालामध्ये आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, त्याचवेळी यासाठी कोणत्या निकषांचा अध्यक्षांनी विचार करायला हवा, याविषयीही न्यायालयाने टिप्पणी केली. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा अशाच प्रकारे न्यायालयाने परखड शब्दांत अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुनावल्यानंतर आता १० जानेवारी म्हणजेच उद्या यासंदर्भात अंतिम निकाल येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात…
या निकालाबाबत वेगवेगळे दावे केले जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच बाजूने निकाल लागण्याची अपेक्षा आहे. “विरोधकांकडे आरोप करण्याशिवाय दुसरा मुद्दा नाही. अध्यक्षांकडे सुनावणी झाली, त्याचा निकाल आता लागेल. पण मी एवढंच सांगतो, लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडे आहे. विधानसभेतही बहुमत आहे, लोकसभेतही बहुमत आहे. निवडणूक आयोगानंही अधिकृत शिवसेना पक्ष व चिन्ह आम्हाला दिलं आहे. त्यामुळे मला वाटतं मेरिटप्रमाणे निकाल मिळायला हवा”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“आम्ही कोणत्याही प्रकारे नियम सोडून काम केलेलं नाही. हे सरकार नियमाने स्थापन झालेलं आहे. त्यामुळे बहुमत लक्षात घेऊनच निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. मला खात्री आहे की मेरिटप्रमाणे निकाल लागेल”, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
राहुल नार्वेकर-एकनाथ शिंदे भेट?
राहुल नार्वेकरांनी उद्याच्या निकालाच्या आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. अशा प्रकारे जर न्यायाधीशच आरोपीला भेटत असतील, तर राहुल नार्वेकरांकडून कोणत्या निकालाची अपेक्षा ठेवणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. आता उद्या राहुल नार्वेकर काय निर्णय देतायत, हे आम्हाला बघायचंय, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
विरोधक म्हणतात, “निकाल नियमाविरुद्ध लागेल”
दरम्यान, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या बाजूने निकाल लागण्याची अपेक्षा असताना विरोधकांनी निकाल काहीही लागला, तरी त्याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. “हा निकाल नियमाला धरून लागण्याची शक्यता नाही. राहुल नार्वेकर काय निकाल देतात, हे पाहावं लागेल. पण त्यानंतर पहिला राजकीय भूकंप होईल. कारण राहुल नार्वेकरांनी निर्णय घेतल्यानंतर त्यावर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेतं, हे महत्त्वाचं ठरेल. राहुल नार्वेकर निकाल देण्यापासून अलिप्तही राहू शकतात”, अशी सूचक प्रतिक्रिया काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
“मी म्हणतो नार्वेकरांनी निकाल देत नाही असं सांगावं!”
दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी मात्र राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाने निकाल देण्यासंदर्भात आदेश देणं घटनाविरोधी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. “विधानसभा अध्यक्ष हे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली येत नाहीत. त्यामुळे त्यांनी थेट न्यायालयाला सांगून टाकावं की मी निकाल देणार नाही, काय हवं ते करा. मला हवं तेव्हाच मी निकाल देईन”, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.