शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सावलीसारखं त्यांच्यासोबत राहिलेल्या चंपासिंह थापा यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटातून थापा यांच्यावर टीका केली जातेय. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी थापा यांना ‘मातोश्री’चे कुत्रे फिरवणारी व्यक्ती असा उल्लेख केला आहे. या वक्तव्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगातील एकमेव हिंदू राष्ट्र असलेल्या नेपाळमधून आलेल्या थापा यांनी बाळासाहेबांची शेवटच्या क्षणापर्यंत सेवा केली. अशा व्यक्तीचं कुत्रं फिरवणारा माणूस असा उल्लेख करणं, अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा- “शिंदे गटाकडून ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवण्याचा डाव” न्यायालयीन सुनावणीआधीच किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान

गेल्या अडीच वर्षात ज्या काही घडामोडी घडल्या, दरम्यान थापा मला भेटले होते. राज्यात सत्तेसाठी तडजोड करण्याचं जे काम सुरू आहे, ते थापा यांना आवडलं नव्हतं. ते नाराज होते. याच पार्श्वभूमीवर ते आज मला भेटायला आले. तुम्ही बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जात आहात. आमचं नेपाळदेखील हिंदूराष्ट्र आहे. त्यामुळे मी बाळासाहेब ठाकरेंसोबत मागील अनेक वर्षांपासून मनापासून काम केलं. मी तुमच्यासोबत काम करायला इच्छुक आहे, असं म्हणत थापा यांनी माझ्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

हेही वाचा- “उद्धव ठाकरेंना फटके द्यायला पाहिजेत, कारण…” निलेश राणेंची बोचरी टीका!

परंतु ही बाब उद्धव गटातील नेत्यांना खुपली आहे. थापा यांचा उल्लेख कुत्रं फिरवणारा माणूस, लादी पुसणारा माणूस करणं चुकीचं आहेत. आतापर्यंत त्यांनी सगळ्यांनाच नोकर समजलं आहे. दुसऱ्यांना वेगवेगळ्या उपमा दिल्यामुळेच त्यांची आज अशी परिस्थिती झाली आहे. थापा हा पैशाने विकला जाणारा माणूस नाहीये. तो एक निष्ठावान माणूस आहे. बाळासाहेबांनी त्यांना अनेक वर्षे ठेवलं. बाळासाहेब आणि थापा हे काही समीकरण आख्ख्या देशानं पाहिलं आहे. थापावर केलेला आरोप हा त्यांचा अपमान आहे. मी याचा जाहीर निषेध करतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde on thackeray group champa singh thapa rno news rmm