महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेतले होते. त्यानंतर राज्यात सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळानं घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे. यावरून शिंदे सरकारकर विरोधकांकडून टीका केली जात आहे. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतरही घाई-गडबडीत अनेक निर्णय घेतले, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

“माझ्या माहितीप्रमाणे, उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या दोन मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३०० ते ४०० निर्णय घेतले. जिथे एक रुपयाची तरतूद करायला हवी, तिथे १० रुपयांची तरतूद करण्यासारखे काही निर्णय घेतले. त्यामुळे आम्ही काही निर्णयांना स्थगिती दिली. संबंधित निर्णय आम्ही रद्द केले नाहीत, संबंधित निर्णयांचा सविस्तर आढावा घेऊन ते अमलात आणले जातील. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतरही घाई-गडबडीत काही निर्णय (ऑर्डर्स) घेतले होते” असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा- “पक्षादेशापुढे ‘राज्यपाल’ पदाला…” अमोल मिटकरींचा भगतसिंह कोश्यारींना खोचक टोला!

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांना केलेल्या मदतीची तुलनादेखील केली आहे. मविआ सरकारने ऑगस्ट २०२० रोजी एनडीआरएफच्या निकषानुसार, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर प्रमाणे मदत केली होती. जुलै २०२१ जिरायती भागाला १० हजार रुपये प्रति हेक्टर जाहीर केले होते. तेच आता आमच्या सरकारने वाढवून १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर केली आहे. मविआकडून बागायती पिकांसाठी प्रति हेक्टर १५ हजार रुपये मदत केली जात होती, आम्ही ती वाढवून २७ हजार रुपये इतकी केली आहे.

हेही वाचा- सत्तेची मस्ती डोक्यात गेली का? अजित पवारांचा शिंदे सरकारला खडा सवाल! संतोष बांगर यांनाही सुनावलं

तसेच बहुवार्षिक पिकांसाठी आघाडी सरकारकडून दोन हेक्टरसाठी प्रत्येक २५ हजार रुपये अनुदान दिलं जात होतं. पण आमच्या सरकारने यात वाढ करून ३६ हजार रुपयांची मदत घोषित केली आहे. शिवाय दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत वाढवली आहे. म्हणजे मविआच्या सरकारच्या तुलनेत आम्ही दुपटीपेक्षा अधिकची मदत जाहीर केली आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Story img Loader