मुंबईतील आझाद मैदानावर शिंदे गटाचा ‘दसरा मेळावा’ पार पडला. या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांच्यामुळे शिवसेना पक्ष कशाप्रकारे लयास गेला? यावरही एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं. तसेच इर्शाळगड दुर्घटनेच्या वेळी उद्धव ठाकरे केवळ घटनास्थळी आले, प्रसारमाध्यमांशी बोलले आणि निघून गेले, असा आरोपही एकनाथ शिंदेंनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी २६ जुलै २००५ रोजी मुंबईत आलेल्या महापुराचा उल्लेख करतही उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं. यादिवशी वांद्रे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं. तेव्हा उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंना ‘मातोश्री’वर सोडून पंचतारांकित हॉटेलमध्ये राहायला गेले होते, असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं.

हेही वाचा- “अजित पवारांना सोडणार नाही, उलटं लटकवणार…”, PM मोदींच्या विधानाचा उल्लेख करत संजय राऊतांचा हल्लाबोल

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “२६ जुलै २००५ च्या महापुरात वांद्रे परिसरात सगळीकडे पाणी भरलं होतं. तेव्हा तुम्ही (उद्धव ठाकरे) बाळासाहेबांना एकट्याला सोडून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायला गेलात. बाळासाहेबांना तुम्ही पाण्यात ‘मातोश्री’वर सोडलं. जे बाळासाहेबांचे होऊ शकत नाहीत, ते तुमचे-आमचे काय होणार? हा विचार करण्याची आवश्यकता आहे. एकदा का त्यांनी एखाद्याचा काटा काढायचं ठरवलं, तर ते बरोबर काटा काढतात. याची उदाहरणं मी याठिकाणी देऊ इच्छित नाहीत.”

हेही वाचा- “…त्यानंतर लगेच आनंद दिघेंचे पंख छाटण्याचे काम सुरू झाले”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप

इर्शाळगड दुर्घटनेवर भाष्य करताना एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मी जीवाची पर्वा न करता काम करतो. इर्शाळगडावर जाऊ नका, असं सगळेजण सांगत होते. तिथे उन, वारा, पाऊस सगळं आहे. गडावर आपलं एनडीआरएफ गेलं होतं. अत्यावश्यक सेवेचे लोकही गेले होते. मृतांचे नातेवाईक गडावर होते. पण एकनाथ शिंदे चिखल तुडवत वर गेले. तुम्ही (उद्धव ठाकरे) आलात व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसलात आणि निघून गेलात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde on uddhav thackeray dasara melava 2023 balasaheb thackeray 26 july 2005 flood in mumbai rmm