Eknath Shinde On Uddhav Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकांची (Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांचा प्रचाराचा धडाका सुरु आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या विविध मतदारसंघात भव्य प्रचारसभा पार पडत आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाटण मतदारसंघात जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच आधीचं महाविकास आघाडीचं सरकार हे बहिरं होतं, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“आपल्या मतदारसंघात काय पाहिजे आणि काय नाही? हे शंभूराज देसाई यांना सर्व माहिती आहे. शंभूराज देसाई तीन वेळा निवडून आलेले आहेत. पण यावेळी ते चौकार मारणार आहेत. लोकप्रतिनिधी कसा असावा? याचं उदाहरण शंभूराज देसाई हे आहेत. मतदारसंघात किती पैसे मिळाले मी त्यांना विचारलं तर दोन हजार ९२० कोटी या मतदारसंघात आणण्याचं काम शंभूराज देसाई यांनी केलं. खरं म्हणजे आम्ही दोन वर्षांपूर्वी आम्ही उठाव केला नसता तर तुमच्या मतदारसंघात दोन हजार कोटी मिळाले असते का? कारण मागच्या सरकारचा अडीच वर्षांचा कालावधी आम्ही पाहिला. अडीच वर्ष हे आमदार वनवन भटकत होते. मतदारसंघासाठी काहीतरी करा, मतदारसंघासाठी निधी द्या. मतदारसंघातील प्रश्न सोडवा, पाण्याचे प्रश्न सोडवा. मात्र, जे सरकार असतं ते ऐकणारं असावं लागतं. संवाद साधणारं असावं लागतं. पण आधीचं सरकार हे बहिरं होतं”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला.

हेही वाचा : सुरतमध्ये महाराजांचं मंदिर, मुलांना मोफत शिक्षण अन् जीवनावश्यक वस्तूंचे स्थिर दर; राधानगरीच्या सभेत ठाकरेंनी कोणी वचने दिली?

“आधीचं सरकार काहीही ऐकत नव्हतं. फक्त मेरी आवाज सुनो एवढंच त्यांना माहिती होतं. घरात बसून फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नाही. त्यासाठी लोकांच्या बांधावर जावं लागतं. शेतकऱ्यांची अडचण ऐकावी लागते. फक्त कोमट पाणी प्या असं म्हणून चालत नाही. लोकांच्या पोटाला काय पाहिजे? हे देखील विचारावं लागतं. कोवीडच्या काळात मी पीपीई किट घालून लोकांमध्ये गेलो. शंभूराज देसाई हे सुद्धा गेले. मला माहिती आहे की, जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा शंभूराज देसाई पुढे असतात. त्यामुळे येथील जनतेने त्यांना तीन वेळा निवडून दिलं. या ठिकाणी मला कोणीतरी सांगितलं की, तिरंगी लढत आहे, मला तर या ठिकाणी एकतर्फी लढत दिसतेय. या ठिकाणी कोणीही आलं तरी त्याचा निभाव लागणार नाही”, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

‘…म्हणून त्यांना दोन जिल्ह्याचं पालकमंत्री बनवलं’

“ज्यावेळी आम्ही उठाव केला त्यावेळी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे माझ्या पुढे दोन पावलं होते. त्यामुळे मी त्यांना दोन जिल्ह्याचं पालकमंत्री बनवलं. एक सातारा आणि एक ठाणे जिल्हा. याचं कारण म्हणजे ज्यावेळी उठाव केला त्यावेळी ते सर्वात पुढे होते. माझ्या खांद्याला खांदा लावून ते पुढे राहिले. त्यांनी कधी विचारलं नाही की आपण कुठे चाललो आहोत? कशासाठी चाललो आहोत? त्यांनी छातीचा कोट करून लढाई केली आणि याच पाटणंच पाणी मला दिसलं. त्यामुळे जो शब्द देतो आणि तो शब्द पाळतो तो माणूस मला आवडतो. पाटणमध्ये कोणीही येवो, पण पाटणचा गड शंभूराज देसाई हेच राखणार”, असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं आहे.

“जेव्हा लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचे विचार सोडले. पक्ष विकायला काढला. तेव्हा शिवसेनेचं खच्चीकरण व्हायला लागलं. बाळासाहबे ठाकरे यांचे विचार तोडून मोडून टाकले. तेव्हा आपले कार्यकर्ते आणि शंभूराज देसाई मला म्हणायचे की कधी उठाव करायचा? तेव्हा मी म्हटलं की थांबा आपण वेळेवर बरोबर करू. वेळेवर करेक्ट कार्यक्रम करायला वेळ साधायची असते. टप्प्यात यावं लागतं. टप्प्यात आला की कार्यक्रम झाला”, असं म्हणत नाव न घेता मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.