क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन गय करणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे.

‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत. याबद्दल अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेबसाईटवरील मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
nana patole latest marathi news
“‘शेटजी-भटजी’च्या पक्षाला ओबीसी नेत्यांनी मोठे केले”, पटोले म्हणतात, “बावनकुळेंनी अपमान सहन करण्यापेक्षा…”
narendra modi criticized congress
“काँग्रेसची मानसिकता गुलामगिरीची, त्यांनी नेहमीच महाराष्ट्राचा… ”; पुण्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!
UP CM Yogi Adityanath
Yogi Adityanath : ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा देऊन योगी आदित्यनाथ यांनी काय साधलं?
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”
supriya sule on devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांविरोधात आता खटला भरला पाहिजे, त्यांनी राज्यातील…”; छगन भुजबळांच्या ‘त्या’ दाव्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल!
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“महापुरुषांच्या बाबतीत लिखाण करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण असायला हवे. तसेच त्यामधून त्यांचा अवमान होणार नाही, याची दक्षता लेखक किंवा प्रकाशन संस्थांनी घेणं गरजेचं आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन गय करणार नाही,” असा इशारा देतानाच “‘इंडिक टेल्स’ वरील लेखात आक्षेपार्ह बाबी असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी,” असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

हेही वाचा : सुषमा अंधारे प्रकरणात संजय शिरसाटांना खरंच क्लीनचिट? रुपाली चाकणकर म्हणाल्या, “मिळालेल्या अहवालातून…”

“‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ यांनी…”

दरम्यान, बुधवारी ( ३१ मे ) राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यानंतर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “महापुरुषांबद्दल सातत्याने बेताल वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीरांची संख्या हल्ली वाढली आहे. ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ यांनी वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे,” असं अजित पवार म्हणाले.

“…तर तुमची यंत्रणा लगेच कामाला लागते”

“सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांच्याबाबत गरळ ओकण्याचं काम केलं जातंय. याचा तपास केला पाहिजे. आयुक्तांना हेच सांगितलं की इतरांच्या बाबतीत कुणाचं काही झालं, तर तुमची यंत्रणा लगेच कामाला लागते. पण हे त्यापेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाचं आहे”, असं अजित पवारांनी म्हटलं.

हेही वाचा : “गजानन कीर्तीकरांना दट्ट्या मारला म्हणून…”, ठाकरे गटाच्या खासदाराचा दावा; म्हणाले, “काही दिवसांत स्फोट…”!

“मुलींची पहिल्या शाळा सुरू करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल…”

माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितलं, “इंडिक टेल्स या बेवसाईटवर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य लिहिण्यात आली आहेत. आमच्यासाठी या दोन्ही व्यक्ती दैवत आहेत. हे आम्ही मुळीच सहन करू शकत नाही. मुलींची पहिल्या शाळा सुरू करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि घाणेरडं लिखाण केलं जात आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो. लिखाण करणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई केली जावी,” अशी मागणी भुजबळांनी केली आहे.