शिवसेनेत बंडखोरी होऊन राज्यातील महाविकासआघाडी सरकार कोसळलं. या घटनेचे पडसाद एवढ्यावरच थांबले नाही, तर पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाचं यावरून मोठा वाद झाला आणि निवडणूक आयोगाने पक्ष व पक्षचिन्ह शिंदे गटाला दिलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली आणि बंडखोर अजित पवार गट पक्ष व पक्षचिन्हावर दावा करत निवडणूक आयोगात गेला. आज त्या प्रकरणावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी राष्ट्रवादीचं घड्याळ कुणाला मिळेल, अशी विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (६ ऑक्टोबर) दिल्लीत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धनुष्यबाण शिंदे गटाला, आता घड्याळ कुणाला मिळेल? या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले, “आजपासून निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. आयोग योग्य तो निर्णय घेईन. लोकशाहीत ज्या बाबींची दखल घेतली जाते त्याप्रमाणे निवडणूक आयोग योग्य निर्णय घेईन.”

“…म्हणून गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागली”

एकनाथ शिंदे म्हणाले, “गोरेगावमध्ये एसआरएची जय भवानी इमारत आहे. त्या इमारतीत आग लागली आहे. मी सातत्याने महापालिका आयुक्त, पोलीस अधिकारी यांच्याशी बोलत आहे. मी त्यांच्याकडून माहिती घेतली आहे. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या पार्किंगमध्ये कागद आणि कापडाचे गठ्ठे होते. त्यामुळे आग लागली असं प्राथमिक स्तरावर निदर्शनास आलं आहे.”

“मृतांच्या कुटुंबाला सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत”

https://x.com/mieknathshinde/status/1710162455698227254

हेही वाचा : VIDEO: मुंबईतील गोरेगावमध्ये इमारतीच्या पार्किंगला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू, तर अनेकजण जखमी

“झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. ज्यांचा या आगीत मृत्यू झाला आहे त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबाला सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जखमींचा संपूर्ण उपचार सरकार करेन, असाही निर्णय घेण्यात आला आहे,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde over election commission hearing on ncp party symbol claim pbs
Show comments