‘दैनिक लोकसत्ता’च्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या खास सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी राज्यातील राज्यातील विकासकामे, रस्ते बांधणी, मुंबईतील विकास यावर भाष्य केले.
मी आहे तसाच आहे. मी कालही कार्यकर्ता होतो. आजही कार्यकर्ता आहे. उद्याही मी कार्यकर्ताच म्हणून काम करेन, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्ही उद्योगांना सिंगल विंडो क्लिअरन्स देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याची भरभराट करायची असेल तर नवे उद्योग आले पाहिजेत. उद्योगांना आम्ही सवलती देत आहोत. या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून राज्याचा विकास करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.
राज्यातील समृद्धी मार्ग गेमचेंजर ठरेल. आज मुंबई-पुणे एक्स्प्रेसचे काम सुरू आहे. आज मेट्रोचे काम सुरू आहे. ३३७ किलोमिटर मेट्रोचे जाळे निर्माण झाल्यानंतर ६० ते ७० लाख वाहनं रस्त्याच्या बाजूला होतील. लोकांचा वेळ वाचेल. ते वाचलेला वेळ आपल्या कुटुंबाला देतील. जे होणार आहे तेच मी बोलतो. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. आम्हाला जशी २ वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करायची असे आम्ही ठरवले आहे.
महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन आहे. देशीच अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी काम केले पाहिजे.
आम्ही सहा ते सात महिन्यांपूर्वीच लोकांची सत्ता आणण्याचे काम केले आहे. मी राजकारणावर बोलणार नाही. मात्र मागील सहा ते सात महिन्यांपासून आम्ही काम करत आहोत. आम्ही लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहोत.
गिरिश कुबेर यांनी टाटा समूहावर एक पुस्तक लिहिले. लोकसत्ताकडून समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थाना उभारी देण्याचे काम केले जाते. तरुण तेजांकित, नवदुर्गा असे विविध उपक्रम लोकसत्ता वर्तमानपत्राकडून राबवले जातात.
लोकसत्ताने आपली विश्वासार्हता जपण्याचे आतापर्यंत काम केलेले आहे. लोकसत्ता दैनिक स्थानिक पातळीपासून, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करते. मीदेखील लोकसत्ता वर्तमानपत्र रोज वाचतो.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली आहे. लोकसत्ताच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमत्त मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. लोकसत्ता, सर्व समूहाचे, गिरिश कुबेर अशा सर्वांना शुभेच्छा देतो.
एकनाथ शिंदे चर्चेदरम्यान राज्यातील विकासकामे, राजकारण, राज्याची सामाजिक स्थिती अशा सर्व विषयांवर बोलण्याची शक्यता आहे.
लोकसत्ताच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहिले आहेत. या कार्यक्रमात ते लोकसत्ताशी खास बातचित करणार आहेत.