CM Eknath Shinde Net Worth: विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. आरोप-प्रत्यारोप आणि जागावाटपाचा तिढा यामुळे महायुती व महाविका आघाडी यांच्यात कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच नाराजांच्या हालचालींची भर पडत आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व माघारी घेण्याची पहिली प्रक्रिया पार पडत असून उमेदवारी अर्जासोबत उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्यानावे असणारी संपत्ती उघड होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबतच्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती समोर आली आहे. त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या केदार दिघे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदेंची संपत्ती तब्बल १६ कोटींनी जास्त आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिंदेंच्या संपत्तीत तिप्पट वाढ!

एकनाथ शिंदेंनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या संपत्तीत २०१९ च्या तुलनेत तब्बल तिप्पट वाढ झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीवेळी एकनाथ शिंदेंनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती १३ कोटी ६६ लाख ७४ हजार ९३२ इतक्या मूल्याची होती. सोमवारी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा आकडा थेट ३७ कोटी ६८ लाख ५८ हजार १५० इतका वाढला आहे!

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या मिरवणुकीत चोरट्यांचा सुळसुळाट

एकनाथ शिंदेंच्या नावे असणाऱ्या ३७ कोटींहून अधिकच्या संपत्तीमध्ये ९ कोटी २१ लाख ७८ हजार १५० रुपये मूल्य असणारी जंगम मालमत्ता तर २८ कोटी ४६ लाख ८० हजार रूपये मूल्य असणारी स्थावर मालमत्ता आहे. याच प्रतिज्ञापत्रात एकनाथ शिंदेंवर ९ गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याशिवाय, त्यांचं शिक्षण एमए झाल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केदार दिघे, त्यांची किती संपत्ती?

दरम्यान, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रात आणखी एक काका-पुतणे आमने-सामने उभे ठाकल्याचं दिसून येत आहे. केदार दिघेंनीही उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्यानावे एकूण संपत्ती १ कोटी २० लाख ५६ हजार २५५ रुपये मूल्याची आहे. त्यात ६५ लाख ५६ हजार २५५ रुपये मूल्याचं जंगम मालमत्ता आहे. केदार दिखे वाणिज्य शाखेचे पदवीधर असून त्यांच्यावर २ गुन्हे दाखल आहेत.

कोट्यवधींच्या रांगेत अमित ठाकरेही!

दरम्यान, मनसेकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यानावे एकूण मालमत्ता १६ कोटी १६ लाख रुपये मूल्याची आहे. त्यात १ कोटी २९ लाखांची स्थावर तर १४ कोटी ८७ लाखांची जंगम मालमत्ता आहे. अमित ठाकरे यांच्यावर एकही गुन्हा दाखल नसून त्यांनी व्यवस्थापन शाखेची पदवी पूर्ण केली आहे.