मुंबईच्या शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे गटाने शिवाजी पार्कसाठी केलेला अर्ज मागे घेतल्याने तिथं आता ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यावरून ठाकरे गटाने जल्लोषही केला. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी X या सोशल मीडियावर त्यांचं निवेदन सादर केले आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटावरही टीका केली आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा बुलंद आवाज ज्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी ऐकला, ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला गाडण्याचा विचार मांडला, ज्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर त्यांनी केला, त्याच मैदानातून काँग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले शिवतीर्थ गेल्याच वर्षी या मंडळींनी बाटवले आहे. आम्ही ठरवले असते तर या मैदानावर सभा घेतलीही असती. परंतु, राज्याचा प्रमुख म्हणून मला कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणायची नव्हती”, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
“बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व एवढे अस्सल आहेत की ते कुठेही सांगितले तरी त्यांचे तेज कमी होत नाही. त्या विचारांना शिवाजी पार्कची गरज नाही. आम्ही जाऊ तिथे त्यांचे विचार नेऊ. आपल्याला वारसा मिळाला असे म्हणणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा म्हणजे खरे काय ते कळेल”, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटावर केली आहे.
हेही वाचा >> शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने अर्ज मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“कोण कुठे बोलतो, यापेक्षा काय बोलतो हे महत्त्वाचे आहे. तोंड उघडले की रडगाणेच गाणार असाल तर ते कोण ऐकणार? बाळासाहेबांचा विचार त्यांनी पायदळी तुडवलाय, हे जनतेने पाहिले आहे. आम्ही बाळासाहेबांनी पेरलेले, जपलेले विचार हृदयात घेऊन पुढे निघालोय. विचारांचा वारसा आमच्याकडेच आहे. छाती बडवून रडायला शिवाजी पार्क ही जागा नाही, जिथे बाळासाहेबांना अंगार फुलवला होता तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शिवाजी पार्कमध्ये ठाकरे गटाचा दसरा मेळावा
“शिवाजी पार्कचं मैदान आम्हाला हिंदुत्वाच्या विचारांसाठी मिळावं, अशी आमची भूमिका होती. पण, वाद टाळण्यासाठी आझाद मैदान किंवा क्रांती मैदानातून हिंदुत्वाचे विचार आपल्याला मांडता येतील, अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, अशी प्रतिक्रिया सदा सरवणकर यांनी दिली. त्यामुळे शिवाजी पार्क येथे आता ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
“शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा ही आपली परंपरा आहे. यावर्षीसुद्धा वाजत गाजत उत्साहाने शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थ येथे दसरा मेळावा होणार आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.