तीन राज्यांच्या निवडणुका आणि पुण्यातील पोटनिवडणुकीच्या निकालासंदर्भात बोलताना, देशात आता सरकार बदलण्याचा मूड तयार होतो आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली होती. त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यासंदर्भात भाष्य केलं आहे.

हेही वाचा – औरंगाबाद नामांतर प्रकरण : इम्तियाज जलील यांच्या आंदोलनात झळकवले औरंगजेबाचे छायाचित्र; प्रकाश आबंडेकर म्हणाले, “बाबासाहेबांनी…”

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sadhguru disheartened over Parliament disruptions on adani issue
Sadhguru on Adani: ‘उद्योगपतींवरून संसदेत रणकंदन नको’, अदाणींना समर्थन देत सद्गुरुंनी व्यक्त केली नाराजी
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
expectations from mahayuti
लेख : नव्या सरकारकडून अपेक्षा
News About Loksabha
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष

काय म्हणाले मुख्यमंत्री?

गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा या निवडणुकीत भाजपाचा पराभव होईल, असं शरद पवार म्हणाले होते. मात्र, सर्वांना माहिती आहे, की उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला ३०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. गोव्यातही भाजपाचा विजय झाला. ते आता कसब्याचं उदाहरण देत आहेत. पण त्याचवेळी तीन राज्यात भाजपाचा विजय झाला आहे. त्यामुळे त्यांच्या सारखा अनुभवी नेता तीन राज्यांच्या निवडणुकीच्या निकालावर दुर्लेक्ष करू शकतो, ही आश्चर्याची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हेही वाचा – कसब्यात धंगेकरांच्या विजयाचा नेमका अर्थ काय? प्रकाश आंबेडकरांनी केलं महत्त्वाचं विधान; म्हणाले, “या निकालातून…”

एकदा हवामान खात्याने पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवली होती. पण शरद पवार म्हणाले पाऊस पडणार नाही. मी चुकीचं ठरलो तर १०० पोती साखर वाटेल. त्यानंतर शरद पवारांनी सांगितलेलं भाकीत खोटं ठरलं आणि पाऊस पडला. त्यांनी १०० पोती साखर प्रामाणिकपणे वाटलीही. त्यामुळे जेव्हा-जेव्हा शरद पवार काही सांगतात, तेव्हा तेव्हा नेमकं त्याच्या उलट घडणार असतं, असं म्हणतात, अशी टीप्पणीही त्यांनी केली.

Story img Loader