महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे हे भाजपाबरोबर जाण्यास तयार होते आणि त्यासाठी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात बैठकही झाली होती, असा दावा सध्या महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाबरोबर जाण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली होती. ही बाब खरी आहे, असे ते म्हणाले. एपीबी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझा व्हिजन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर दिल्लीत बैठक झाली, हे सर्वांना माहिती आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात वैयक्तिक बैठक झाली होती. त्या बैठकीत भाजपाबरोबर जाण्याबाबत चर्चा झाली होती. या बैठकीचा तपशील मी आता सांगणार नाही. मात्र, ही बैठक झाली, हे खरं आहे. याचाच अर्थ उद्धव ठाकरेंनी आधी भाजपा आणि महायुतीला फसवलं, महाराष्ट्रातील जनतेला फसवलं, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आणि दुसऱ्यांना महाविकास आघाडीलाही फसवण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न होता, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

Uddhav Thackeray on Eknath Shinde
Uddhav Thackeray: “मिंध्या तू मर्दाची…”, एकनाथ शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह विधान; वाचा काय म्हणाले?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde
“माझी बॅग तुझ्याकडे देतो, फक्त त्यातले कपडे…”; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!

हेही वाचा – राज ठाकरेंबरोबर युती करताना नातं आडवं येतं का? आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले……

पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकाही केली. भाजपा आणि महाविकास आघाडी या दोघांनाही फसवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला. कारण त्यांना खुर्चीचा मोह सुटत नव्हता. त्यांनी विरोधातील १२ आमदारांना निलंबित केले. याशिवाय भाजपाच्या काही आमदारांना तुरुंगात टाकण्याचा आणि भाजपाचे २० ते २५ आमदार फोडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडत होतं, असे ते म्हणाले.

सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी काय म्हटलं होतं?

दरम्यान, उद्धव ठाकरे हे भाजपाबरोबर जाण्यासाठी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी केला होता. लोकसत्ताच्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत भाष्य केलं होतं. “महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण हे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेले होते. मात्र, त्यावेळी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये एक तास चर्चा झाली होती. ते चर्चेसाठी वेगळे बसले होते. याबाबत त्यांचे काही लोक जे आता रोज सकाळी बोलण्यासाठी येतात (संजय राऊत) ते नाकरतील. मात्र, काही लोकांनी हे सांगितलं होतं की, उद्धव टाकरे हे पाऊल (भाजपा बरोबर जाण्याचं) उचलणार होते”, असं ते म्हणाले होते.

याशिवाय एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना सुनील तटकरे यांनीही अशाच प्रकारचा दावा केला होता. २०२१ मध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाणांनी मोदींची विकासकामांबाबत भेट घेतली होती. त्या भेटीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत जाण्यासाठी इच्छुक होते असं तटकरेंनी सांगितलं होतं.