PM Modi Nashik Visit Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक व नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान नाशिकमधील काळाराम मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं. तसेच, राष्ट्रीय युवा महोत्सवातही त्यांची प्रमुख उपस्थिती होती. या महोत्सवात बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर उपस्थित असताना त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. तसेच, यावेळी त्यांनी नुकत्याच झालेल्या मालदीव वादावर मोदींच्या उपस्थितीतच टोलेबाजी केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बाळासाहेब ठाकरेंसह संपूर्ण भारताचं स्वप्न राम मंदिराच्या रुपाने साकार होत असल्याचं सांगितलं. “महाराष्ट्राच्या कुंभभूमीत आज युवकांचा फार मोठा कुंभ होतोय. ही आमच्यासाठी फार मोठी आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शांनी पावन भूमीवर आज आपले पंतप्रधान आले आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. बाळासाहेब ठाकरेंसह देशभरातल्या तमाम लोकांचं राम मंदिराचं स्वप्न पंतप्रधानांनी पूर्ण केलं आहे त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Shiv sena Sanjay Shirsat
Santosh Deshmukh Case : शिंदेंच्या शिवसेनेने घेतलं संतोष देशमुखांच्या कुटुंबाचं पालकत्व; संजय शिरसाटांनी दिली मोठी माहिती
Deputy Chief Minister Eknath Shinde on a tour of Dare village
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे दौऱ्यावर
Eknath Shinde Shivsena Reaction on Raj Uddhav Meet
Raj Uddhav Meet : राज ठाकरे-उद्धव ठाकरे भेटीवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, “ते दोघं एकत्र….”
Eknath Shinde
चार मंत्री असलेल्या साताऱ्यात पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणाची वर्णी लागणार? शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका स्पष्ट, म्हणाले…
Will Deputy Chief Minister Eknath Shinde succeed in retaining post of Guardian Minister of Thane
अजित पवारांचा कित्ता एकनाथ शिंदे गिरवणार का?
Transport Minister Pratap Sarnaik expressed wish that Eknath Shinde should get post of guardian minister of Thane district
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनीच स्विकारावे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची इच्छा

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या आधी पंतप्रधान मोदींचा देशवासीयांना संदेश; म्हणाले, “आजपासून मी..!”

मालदीव वादावरून टोला!

दरम्यान, यावेळी एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या मालदीव वादावरून टोला लगावला. “मोदी लक्षद्वीपमध्ये काय गेले, तिकडे मालदीवमध्ये भूकंप आला. त्यामुळे आपल्या देशाकडे वाईट नजरेनं पाहण्याची हिंमत कुणीच करू शकत नाही. हे फक्त आपल्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळेच होत आहे. जगभरात आपल्या देशाचं नाव आदरानं घेतलं जात आहे. अनेक देशांचे पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष मोदींकडे सन्मानाने पाहतात. कुणी पंतप्रधानांसोबत सेल्फी काढतो, कुणी बॉस म्हणतो, कुणी वाकून नमस्कार करतो. ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“मोदींनी नऊ वर्षांत एकही दिवस सुट्टी घेतली नाही”

दरम्यान, मोदींनी गेल्या ९ वर्षांत एकही दिवस सुट्टी घेतली नसल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दूरदृष्टी असलेले नेते आहेत. गेल्या ६० वर्षांत झाला नाही, एवढा विकास मोदींनी गेल्या ९ वर्षांत करून दाखवला आहे. मोदींनी गेल्या ९ वर्षांत एक दिवसही सुट्टी घेतली नाही. असे पंतप्रधान आपल्याला मिळाले आहेत हे आपलं नशीब आहे. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केलं आहे”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

“२०४७ सालच्या भारताचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठीच या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. आपला भारत जगात सर्वात तरुण देश आहे. १५ ते २५ वयोगटात आपल्या देशात जवळपास २५ कोटी तरुण आहेत. ही युवाशक्ती देश घडवण्यात पुढच्या २५ वर्षांत मोठं योगदान देणार आहे”, असं एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.

Story img Loader