मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवासापासूनच वेगवेगळ्या ठिकाणी गणपती दर्शनाला हजेरी लावली. गणेशोत्स्वाच्या दुसऱ्याच दिवशी दिवसभर मुख्यमंत्री शिंदेंचं गणेश दर्शन सुरू होते. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, मनसेचे प्रमुख राज ठाकरे , माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी भेट दिली. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याही निवास्थानी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात साहजिकच प्रतिक्रिया उमटली. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे पहिल्यांदाच राज यांच्या घरी गेल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचं पहायला मिळालं या दोन्ही नेत्यांदरम्यान काय चर्चा झाली याबद्दलही राजकीय वर्तुळामध्ये चर्चा दिसून आली. असं असतानाच आता मुख्यमंत्री शिंदे यांना एका मुलाखतीमध्ये या भेटीदरम्यानची चर्चा आणि शिंदे गट मनसे युतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शिंदेंनी सविस्तर उत्तर दिलं आहे.

नक्की वाचा >> CM शिंदेंचा मोठा खुलासा! मोदी, शाहांकडे केलेली ठाकरेंबरोबर बंद दाराआड झालेल्या बैठकीसंदर्भात विचारणा; उत्तर मिळालं, “आम्ही जर…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ सप्टेंबर रोजी दुपारी रिलायन्स उद्योगसमुहाचे मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर शिंदे यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या दादरमधील ‘शीवतीर्थ’ निवासस्थानी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भेट दिली. यावेळी शिंदे गटातील स्थानिक आमदार सदा सरवणकर, मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आदी उपस्थित होते. याच भेटीसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांना टीव्ही ९ च्या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला.

“तुम्ही राज ठाकरेंना भेटले. या भेटीत राजकीय चर्चा झाली अशा सर्वत्र बातम्या आल्या. नक्की काय झालं या भेटीत आणि मनसे तुमच्याबरोबर आल्यास तुमचा पुढील प्लॅन काय असेल?” असा प्रश्न शिंदे यांना या मुलाखतीमध्ये विचारला गेला. त्यावर उत्तर देताना शिंदेंनी, “तुम्हाला खरं सांगू का, राज ठाकरेंवर जेव्हा शस्त्रक्रीया झाली होती त्यावेळेस देखील मी सदिच्छा भेट म्हणून प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जाणार होतो. मात्र सगळे दौरे आणि इतर कारणांमुळे ते राहून गेलेलं होतं. त्यामुळे गणपती उत्सव होता. म्हणून गपणती दर्शनाला गेलेलो. त्यांची सदिच्छा भेटही घेतली,” असं शिंदे म्हणाले.

तसेच, “प्रत्येकवेळी काय भेटीमध्ये राजकारण किंवा राजकारणावर चर्चा झाली असं काही नव्हतं. राजकीय भेट नव्हती सदिच्छा भेट होती,” असंही शिंदेंनी उत्तर देताना स्पष्ट केलं.