माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची एक मुलाखत नुकतीच पार पडली. याबाबत भाजपा नेत्यांनी टीका केली. मनसेने तर दोन मिनिटांची एक प्रति मुलाखत तयार करत उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत काही भाष्य केलं नव्हतं. आज विधानसभेत बोलत असताना शेलक्या शब्दांचा उल्लेख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तसंच दोन भागात जी मुलाखत पार पडली त्या मुलाखतीला ‘घरगुती मुलाखत’ असं संबोधलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे पण वाचा- महिला बचत गटांना दुपटीने अर्थसहाय, ६० लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ, मुख्यमंत्र्यांची घोषणा

माझं कुटुंब , माझी जबाबदारी एवढ्यापुरतं मर्यादित हे सरकार नाही. आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहोत. वर्क फ्रॉम होम आमच्या पद्धतीत बसत नाही असं म्हणत एकनाथ शिंदेंनी टोले लगावले. इर्शाळवाडीची दुर्घटना झाली तेव्हा सरकार दरडग्रस्तांच्या पाठिशी सरकार उभं राहिलं आहे. तसंच ज्या ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली तिथल्या नागरिकांना आपण मदतीचा हात दिला. आपलं सरकार हे सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांना मदत करणारं सरकार आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरतं आमचं सरकार मर्यादित नाही.

इर्शाळगडला दुर्घटना घडली तेव्हा मी तिथे गेलो होतो. काही लोक व्हॅनिटी व्हॅनमधून आले होते. मी गेलो म्हणून मी मोठेपणा सांगत नाही. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी तेव्हा मी संपर्कात होतो. सगळं काम सुरु होतं. एवढी मोठी यंत्रणा पोहचली आणि त्यांना मदत झाली. मी फक्त देखावा करायचा म्हणून गेलो नव्हतो. रस्त्यावर चिखल तुडवत आम्ही जातो. प्रकल्प बघायला जातो ही वस्तुस्थिती आहे. जे आम्हाला नावं ठेवतात त्यांना मी हे बोलते. काही लोक हे वाफेचं इंजिन नाही तर नुसती त्यांच्या तोंडाचीच वाफ असते आणि बुडबुडे येतात असाही टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. आम्ही विचलीत होणार नाही.

VIDEO : “घरात बसून टोमणे कोणालाही मारता येतात, हिंमतवान लोक…”, भाजपाची उद्धव ठाकरेंवर टीका

काहीतरी एक दोन दिवसांपुर्वी कुणीतरी मुलाखत घेतली. जाऊ दे मी त्यात पडत नाही. घरगुती मुलाखत होती. डबल इंजिनचं काम पाहून अजित पवार आमच्या बरोबर आले आहे. ट्रिपल इंजिनचं काम वेगात सुरु आहे. आम्हाला काही लोकांनी नावं ठेवली. पण आम्ही बंद पडलेली कामं सुरु केली का? आम्ही इगो वगैरे बाजूला ठेवले, इगो आणि अहंकार राज्याला मागे घेऊन जातो हे लक्षात घ्यायला पाहिजे.

आमच्या कामाचा वेग वाढल्यामुळे काही लोकांना पोटदुखी झाली आहे. आपल्याला तर सगळ्यांना माहित आहेच. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते आहोत. त्यांच्या विचारांवरच आम्ही पुढे जात आहोत. आम्ही शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरु केला. काही लोक म्हणाले की ही जाहिरातबाजी आहे. पण एकदा आमच्या मंचावर या तुम्हाला वस्तुस्थिती कळेल. काही लोक अनेकांना घरात घेत नव्हते त्यांना सरकार तुमच्या दारी या योजनेचं महत्त्व काय समजणार? असाही प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विचारला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde taunts uddhav thackeray about his interview and other things scj
Show comments