CM Eknath Shinde Video Conferrence With Winner MLA : विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली महायुतीने ही निवडणूक लढवली होती. महायुतीतील सर्वच मित्रपक्षांचा स्ट्राईक रेटही चांगला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून ५७ उमेदवार जाहीर केले होते. त्यापैकी ५६ उमेदवार विजयी झाले आहेत. फक्त दादर माहीम विधानसभा मतदासंघाचे सदा सरवणकर यांचा पराभव झाला. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच पक्षाचे मुख्य नेते यांना सत्तास्थापनेबाबत सर्वाधिकार देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे. तत्पुर्वी एकनाथ शिंदे यांची सर्व विजयी आमदारांबरोबर बैठक पार पडली.

विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक आज मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मित्र पक्षासोबत चर्चा करण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Deputy Chief Minister Eknath Shinde consoled the family of Raghunath More thane news
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रघुनाथ मोरे यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
Dhavalsingh Mohite Patil resigned as district president due to Sushilkumar and Praniti Shindes arbitrariness
सोलापुरात काँग्रेस पक्ष नसून शिंदे काँग्रेस; धवलसिंह मोहिते यांचा आरोप करीत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं

शिवसेनेच्या आमदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी मित्र पक्षासोबत चर्चा करण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा प्रस्ताव मांडला. तर सिद्धेश कदम यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गट नेते, मुख्य प्रतोद, प्रतोद आणि इतर नेत्यांची निवड करण्याचे सर्वांधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना देण्याचा प्रस्ताव मांडला. या बैठकीला ऑनलाइन उपस्थित असलेले आमदार आणि कार्यकरिणीतील इतर सर्व सदस्यांनी या दोन्ही प्रस्तावांना अनुमोदन देऊन याबाबतचे सर्वांधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय एकमताने घेतला.

हेही वाचा >> Mahayuti vs Maha Vikas Aghadi Winner महायुती की महाविकास आघाडी? तुमच्या मतदारसंघात कोण ठरलं वरचढ? वाचा २८८ मतदारसंघांची संपूर्ण यादी!

महायुतीला घवघवीत यश

भारतीय जनता पक्षाला १३२ जागा मिळाल्या असून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला ५७, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला ४१ जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच महायुतीची बेरीज २३० झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना (उद्धव ठाकरे) २० जागा, काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) १० जागांवर विजयी ठरले आहेत. म्हणजेच महाविकास आघाडीची बेरीज ५६ झाली आहे. म्हणजेच महाविकास आघाडीचा या निवडणुकीत दारूण पराभव झाल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे भाजपाच्या नेतृत्त्वात महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. 

वानखेडेवर नव्या सरकारचा शपथविधी?

b

राज्यातील जनतेने स्पष्ट बहुमत दिल्यानंतर आता महायुतीकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यमान विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरपर्यंतच आहे. तत्पूर्वी नवं सरकार स्थापन करणं अपेक्षित आहे. २६ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन झालं नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. त्यामुळे महायुती २६ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करेल. भारतीय जनता पार्टी राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून राज्यपाल या पक्षाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करू शकतात. दरम्यान, अनेक वृत्तवाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत की मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नव्या सरकारचा शपथविधी होईल.

Story img Loader