मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ बुधवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेपूर्वीचा असल्याचं व्हिडीओवरून दिसत आहे. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी या तिघांमध्ये झालेल्या संभाषणावरून विरोधकांनी परखड शब्दांत टीका करायला सुरुवात केल्यानंतर स्वत: मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर येत यासंदर्भात खुलासा केला आहे. तेव्हा नेमकं काय घडलं होतं, याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

काय आहे या व्हिडिओमध्ये?

मराठा आरक्षण व मनोज जरांगे यांच्या उपोषणासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीवर सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना यासंदर्भात माहिती दिली. ही पत्रकार परिषद सुरू होण्याच्या काही मिनीट आधीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
PM Modi
PM Narendra Modi : “विस्तारवाद नाही, विकासवादाच्या भावनेने काम सुरू”, मुंबईत युद्धनौका आणि पाणबुडीचे उद्घाटन केल्यानंतर मोदींची प्रतिक्रिया
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
Gulabrao Patil insta
जळगावचं पालकमंत्रिपद पुन्हा गुलाबराव पाटलांकडेच? घोषणेआधीच मोठं वक्तव्य; विरोधकांना दमबाजी करत म्हणाले…
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”

पत्रकार परिषदेच्या ठिकाणी येताना मुख्यमंत्री “आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं आणि निघायचं”, असं म्हणताना दिसत आहेत. त्यापुढे अजित पवार “येस, येस” असंही म्हणत आहेत. त्याच्याबरोबर असणारे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना माईक चालू असल्याची जाणीव करून दिल्यानंतर अजित पवारांनीही त्यातून आवाज जात असल्याचं सांगितलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गंभीर नसल्याची टीका केली.

नेमकं तेव्हा काय घडलं होतं?

दरम्यान, आपण व्हायरल व्हिडीओत दिसणारं संभाषण नेमकं का करत होतो? यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. “सह्याद्रीमध्ये आम्ही बैठक घेतली. त्या बैठकीत साधक-बाधक चर्चा झाली. राज्यात कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित झाली पाहिजे. राज्यात सर्व जातीधर्मांचे लोक गुण्या-गोविंदाने राहात आहेत. शांतता प्रस्थापित राहिली पाहिजे हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने हिताचं आहे. त्यासाठी आंदोलनाबाबत सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर आम्ही तिघं आपल्याशी चर्चा करायला आलो”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“चर्चेपूर्वी आम्ही पत्रकार परिषदेच्या ठिकाणी बोलतच येत होतो. पण ‘सकारात्मक मुद्द्यांवरच बोलू, कोणतंही राजकीय बोलणं नको’ अशी आमची चर्चा चालू होती. ‘तेवढं बोलून आपण निघू’ असं आम्ही बोललो. ‘कोणतंही राजकीय भाष्य नको’ अशी आमची चर्चा होती. पण आज त्या शब्दांचे पुढचे-मागचे शब्द काढून लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, मराठा समाजात संभ्रमाचं वातावरण निर्माण होईल असा प्रयत्न केला गेला. विघ्नसंतोषी लोकांकडून हे प्रयत्न झाले”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

“…तेव्हा आरक्षण कुणामुळे टिकलं नाही हे…”

दरम्यान, फडणवीसांनी दिलेलं आरक्षण टिकू शकलं नसल्याचं सांगत शिंदेंनी उद्धव ठाकरे सरकारवर टीकास्र सोडलं. “मी तर एवढंच सांगेन की जेव्हा फडणवीसांच्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिलं, उच्च न्यायालयात ते टिकलं. पण सर्वोच्च न्यायालयात ते टिकू शकलं नाही. कुणामुळे त्यावर आज मी बोलू इच्छित नाही”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

“मराठा आरक्षणाबाबत सरकार संवेदनशील, ‘तो’ व्हिडीओ फिरवणं…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

“३७०० अधिसंख्य पदांवर नियुक्त्या देण्याचं धाडस कुणी करत नव्हतं. आम्ही तो निर्णय घेतला. आज तरुण त्या पदांवर काम करत आहेत. सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अत्यंत प्रामाणिक आहे. म्हणून त्या दिवशी आपण सर्वपक्षीय नेत्यांना चर्चेला बोलवलं. काही लोक जाणीवपूर्वक खोडसाळपणा करून मराठा समाजातल्या लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहेत. याला कुणी बळी पडू नका. आमच्या सगळ्यांची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका सरकारची स्पष्ट आहे”, असंही ते म्हणाले.

Story img Loader