मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तांतराच्या चर्चा सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ४० आमदारांसह भाजपाला पाठिंबा देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पण यावर अजित पवारांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करणार आहे, असं विधान अजित पवारांनी केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. अशी एकंदरीत स्थिती असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. कोणतीही पूर्वनियोजित बैठक नसताना एकनाथ शिंदे अचानक राज्यपालांच्या भेटीसाठी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबतचं वृत्त ‘टीव्ही ९ मराठी’ने दिलं आहे.

एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीसाठी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा संबंध सर्वोच्च न्यायालयाच्या संत्तासंघर्षावरील संभाव्य निर्णयाशीही जोडला जात आहे. एकनाथ शिंदे हे स्नेहभोजनासाठी राजभवनावर गेल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. मात्र, यामागे काही राजकीय कारणं असू शकतात, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.