महाराष्ट्राची रंगभूमी भारतातील प्रगत रंगभूमींपैकी एक असून त्याच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारकडून सर्व प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेळगाव येथे ‘अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलना’मध्ये बोलताना दिली. गोरेगावच्या फिल्मसिटीमध्ये मराठी नाटकाचा स्वतंत्र विभाग निर्माण करण्याबाबत विचार करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
अलीकडेच मुंबईमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी फिल्मसिटीमध्ये मराठी नाटकाचा स्वतंत्र विभाग असण्याची गरज बोलून दाखवली होती. त्याबद्दलही सरकार विचार करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नवोदित मराठी नाटय़कर्मींना प्रयोगासाठी अपुऱ्या जागांची समस्या सतत भेडसावत असते. संमेलनाचे माजी अध्यक्ष अरुण काकडे यांनी मांडलेल्या या समस्येची दखलही मुख्यमंत्र्यांनी घेतली. तसेच नाटकांना सरकारी अनुदान वेळेवर मिळेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
मराठी नाटकांचा दर्जा उत्तम असूनही राष्ट्रीय पातळीवर पोहचत नाही. त्यामागची नेमकी कारणे काय आहेत ते तपासण्याची गरज आहे.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
फिल्मसिटीत नाटकासाठी स्वतंत्र विभागाचा विचार
महाराष्ट्राची रंगभूमी भारतातील प्रगत रंगभूमींपैकी एक असून त्याच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारकडून सर्व प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेळगाव येथे ‘अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलना’मध्ये बोलताना दिली.
First published on: 08-02-2015 at 05:26 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm fadnavis at marathi natya sammelan belgaum