ई-ऑफिस कार्यप्रणालीचे उद्घाटन सोमवार, २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. सिंधुदुर्ग नगरी येथे होणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व पालकमंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सिंधुदुर्गात येणार असल्याने राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या महसूल विभागाने ई-ऑफिस प्रकल्प राबविला असून तो राज्यातील पहिला पेपरलेस प्रकल्प ठरणार आहे. जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली.
तहसीलदार कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्याच्या नियोजनाचे उद्घाटन मुख्यमंत्री करणार आहे. महसूलचे ३५४ कर्मचारी एका क्लिकवर डिजिटल सही करणार आहेत. या प्रकल्पामुळे कामातील गतिमानता, पारदर्शकता, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढणार असल्याचे जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी सांगितले. कामाचा ताण कमी होऊन वेळ व पैसा बचत होईल, असे त्यांनी सांगितले.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा