काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या कराड दक्षिणमधून विधानसभेची निवडणूक जिंकण्याचे मनसुबे बाळगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट मतदारांशी संवाद साधत आणि स्थानिक नेत्यांना आपलेसे करत मोर्चेबांधणीला गती दिली आहे. मुख्यमंत्री आज दोन दिवसांच्या कराड दौऱ्यावर आले असून, त्यांनी शहरालगतच्या विद्यानगर येथे सैदापूर पंचक्रोशीतील नागरिकांशी विविध विकासकामे व समस्यांसंदर्भात चर्चा केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस खात्याच्या गृहसंकुलाचे तसेच जिजाऊ या शासकीय विद्यार्थिनी वसतिगृहाचे उद्घाटन समारंभपूर्वक पार पडले.
जनता दरबाराच्या प्रारंभी स्लाइडशोद्वारे परिसरातील विविध समस्या व त्यांचे गांभीर्य चव्हाण यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या योजना व कायद्याच्या चौकटीत आपल्या समस्यांचे निराकरण करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
१९९१ मध्ये खऱ्या अर्थाने आपल्या राजकीय कारकीर्दीस प्रारंभ झाला. तेव्हापासून येथील जनतेने आपल्याला भरभरून प्रेम व आशीर्वाद दिले. त्यातून उतराई होण्यात कुठे कमी पडणार नाही असे आश्वासन त्यांनी
दिले. या वेळी सादर झालेल्या निवेदनांनी अर्धा डझन फाइल्स फुल्ल झाल्या होत्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा