राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (रविवारी) पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला. करोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाी मुंबई लोकल प्रवासाची मुभा देण्याची यावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. २२ एप्रिल २०२१ पासून सर्वसामान्य लोकांना मुंबई आणि परिसरात लोकल प्रवास बंद झाला होता. आता दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार आहे. ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन १४ दिवस झाले असतील, त्यांना आपण १५ ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करता येईल. अॅपद्वारे किंवा पालिकेच्या कार्यलयात पास उपलब्ध होणार आहे. हॉटेल रेस्टॉरंटबाबतचा निर्णय उद्या जाहीर होणार आहे. उद्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हॉटेलबाबतचा निर्णय घेतला जाईल असं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा; १५ ऑगस्टपासून मुंबई लोकल सुरु होणार
दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-08-2021 at 20:12 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm uddhav thackeray on state corona and restriction rmt