राज्यामधील राजकारणात मागील काही दिवसांपासून सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये वाद सुरु असल्याची जोरदार चर्चा आहे. आधी शिवसेनेच्या २५ आमदारांचे निधीवाटपावरून नाराजीचे पत्र, नंतर खासदार गजानन कीर्तीकर व नुकतीच माजी मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा महाविकास आघाडीमध्ये वरचष्मा असल्याची टीका केल्याने महिनाभरात शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींमधील खदखद सातत्याने प्रकट झाली. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर नाराज असल्याची चर्चा दबक्या स्वरात राजकीय वर्तुळात होत होती. मात्र आता यावर थेट मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय.

नक्की वाचा >> “ग्लिसरीनची बाटली घेऊन सगळे पवार लाईनमध्ये उभे होते; शरद पवार पण रडत होते, कधी सुप्रिया सुळे…”

गृहखात्यासंदर्भात चर्चा का?
विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाने हा शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या निकटवर्तीयांना केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून लक्ष्य करत असताना भाजपाच्या नेत्यांविरोधातील तक्रारींवर आक्रमकपणे कारवाई होत नाही, राष्ट्रवादीकडे सहकार व गृह विभाग असूनही कारवाईचा वेग संथ राहतो असे अधिवेशनात बोलले जात होते. त्यामुळे महाविकास आघाडीत भाजपला आक्रमक प्रत्युत्तर देण्यावरून एकजूट नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

नक्की वाचा >> “महाविकास आघाडीचे ९० टक्के आमदार नाराज आहेत असं वाटतं का?” या प्रश्नाला फडणवीस म्हणाले, “यावर मी…”

मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केली माहिती…
याच पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये मतभेद असल्याच्या जोरदार चर्चा असतानाच मुख्यमंत्री गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्याही बातम्या समोर आल्यात. मात्र या बातम्या मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावल्याचं मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामर्फत जारी करण्यात आलेल्या माहितीत म्हटलंय.

नक्की वाचा >> ‘कश्मीर फाइल’ रिलीजच होऊ द्यायला नको होता म्हणणाऱ्या पवारांना फडणवीसांनी हसून दिलं उत्तर; म्हणाले, “राष्ट्रवादी…”

मुख्यमंत्री म्हणाले…
गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. या बातम्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलं आहे. “अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून, माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. ते उत्तम काम करीत आहेत,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Story img Loader